NEET Paper Leak: NEETप्रमाणेच MH-CET मध्येही मोठा घोटाळा? कमी मार्क्सवाल्यांना 100 पर्सेंटाईल्स कसे; काँग्रेसने दिले पुरावे

MH-CET Row After NEET: MH-CET परीक्षेतील निकालांवर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल्स कसे मिळाले, असा सवाल त्यांनी केला आहे.
MH-CET Row After NEET:MH-CET
MH-CET Row After NEET:MH-CET AI Image
Published on
Updated on

MH CET Controversy : देशभरात NEET पेपरफुटी प्रकरणामुळे आधीच विद्यार्थी आणि पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असताना आता महाराष्ट्रातील MH-CET परीक्षेवरूनही मोठा वाद निर्माण झाला आहे. दहावी-बारावीत अत्यंत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना MH-CET मध्ये 100 पर्सेंटाईल्स कसे मिळाले, असा गंभीर सवाल करत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी थेट राज्य सरकार आणि परीक्षा यंत्रणेवर निशाणा साधला आहे. मुंबईंत माध्यमांशी बोलताना सावंत यांनी अनेक विद्यार्थ्यांची गुणांची आकडेवारीच समोर ठेवली.

सचिन सावंत यांनी उपस्थित केलेले मुद्दे

1)३९ टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याला १०० पर्सेंटाईल

या परिक्षेचा अभ्यासक्रम हा ११-१२ वीचा असतो, १० वी १२ परिक्षेत जेमतेम मार्क्स मिळवलेल्या २२ विद्यार्थ्यांना एमएच सीईटीमध्ये मात्र १०० पर्सेंटाईल मिळालेले आहेत. ज्या विद्यार्थ्याला १० व्या परिक्षेत ३७ टक्के मार्क्स मिळाले त्याला एमएच सीईट मध्ये ९९.९७१ टक्के पर्सेंटाईल मिळाले आहेत. बारावीत ज्यांना ५१ टक्के मार्क्स मिळाले अशा दोन विद्यार्थ्यंना एमएच सीईटमध्ये १०० पर्सेंटाईल, ४५ टक्के मार्क्स पडलेल्याला १०० पर्सेंटाईल व ३९ टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्याला १०० पर्सेंटाईल पडलेले आहेत.

2)PCM मध्ये फक्त 39% गुण असूनही राज्यातील टॉप 20 मध्ये

बारावीला ज्या विद्यार्थ्याला ३५ मार्क्स पडले त्यालाही १०० पर्सेंटाईल पडले आहेत. MHT-CET गणितात १०० पर्सेंटाइल मिळवलेल्या रँक 1, 2, 3, 4, 5, 6, 15, 16, 17 आणि 18 या सर्व विद्यार्थ्यांचे HSC गणितातील सरासरी गुण फक्त 64.3% होते. या राज्यातील दहा अव्वल विद्यार्थ्यांपैकी सहा जणांचे गुण या सरासरीपेक्षाही कमी होते — त्यांचे HSC गणितातील गुण अनुक्रमे 60, 54, 53, 53, 40 आणि 35 होते. CET मधील टॉप 20 रँकर्सपैकी 6 विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत 60% पेक्षाही कमी गुण मिळाले.

रँक 1, 2, 5, 12, 15 आणि 18 — ज्यांचे CET पर्सेंटाइल 99.99 किंवा त्यापेक्षा जास्त आहे — यांना HSC PCM मध्ये 60% पेक्षा कमी गुण मिळाले. एका टॉपर ला CET गणितात 100 पर्सेंटाइल मिळाले, पण बोर्डातील एकूण PCM गुण फक्त 39% होते. टॉप 20 मधील 10 विद्यार्थ्यांना CET गणितात परफेक्ट 100 पर्सेंटाइल मिळाले. मात्र त्यांच्या HSC गणितातील गुण 35 ते 97 या दरम्यान आहेत — म्हणजे तब्बल 62 गुणांचे अंतर. एका ला CET गणितात 100 पर्सेंटाइल, पण HSC गणितात फक्त 35% गुण — म्हणजे 65 गुणांचे अंतर. HSC, PCM मध्ये फक्त 39% गुण असूनही राज्यातील टॉप 20 मध्ये स्थान मिळाले आहे.

MH-CET Row After NEET:MH-CET
Shivraj Motegaonkar Arrest: नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकरांच्या अटकेनंतर लातूरच्या राजकारणात खळबळ; भाजप-काँग्रेसचे नेते भिडले!

3)चंद्रकांतदादांनी उत्तर द्यावे

रँक 66 चा डेटा देखील गंभीर प्रश्न निर्माण करणारा आहे. या विद्यार्थ्याला १० वीला गणितात २२ मार्क्स मिळाले होते, तर १२ वी ३३ मार्क्स मिळाले म्हणजे तो गणितात सपशेल नापास आहे, पीसीएम मध्ये ४७.६७ टक्के मार्क्स आहेत त्याला सीईटी मध्ये मात्र ९९.९७१ पर्सेंटाईल मिळाले आहेत. CET मध्ये अत्यंत उच्च पर्सेंटाइल मिळवूनही बोर्ड परीक्षेतील कामगिरी त्याच प्रमाणात दिसत नाही. अशा उदाहरणांमुळे CET आणि HSC या दोन्ही मूल्यमापन पद्धतींमध्ये मोठी विसंगती असल्याचे अधिक स्पष्ट होते. हा चमत्कार कसा झाला, याचे उत्तर उच्च व तंज्ञ शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी द्यावे. तसेच या परिक्षा कोण नियंत्रित करतो, या परिक्षांवर जोशी नामक व्यक्तीचा काय संबंध आहे, याचाही खुलासा केला पाहिजे, असे सावंत म्हणाले.

MH-CET Row After NEET:MH-CET
SRPF Exam Cancelled: NEETनंतर महाराष्ट्रात आणखी एक परीक्षा रद्द; SRPF भरतीतील 85 प्रश्न एकाच पुस्तकामधून

संशयास्पद निकाल

NEET घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर आता MH-CET वरूनही संशय निर्माण झाल्याने राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे मेहनत घेत असताना काही संशयास्पद निकालांमुळे संपूर्ण प्रक्रियेवरील विश्वासच डळमळीत होत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये आहे.

MH-CET Row After NEET:MH-CET
Maharashtra Government Employees News: राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! DA थकबाकी मेच्या पगारासोबत मिळणार

सावंत यांनी परीक्षा सेलमधील काही अधिकाऱ्यांवरही प्रश्न उपस्थित केले. “गेल्या 8-10 वर्षांपासून तेच अधिकारी या विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या बदल्याही झालेल्या नाहीत. परीक्षा प्रक्रियेत कोणाचा हस्तक्षेप आहे का, याची चौकशी झाली पाहिजे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, या आरोपांमुळे राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत पुन्हा एकदा खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com