

CJP News: कॉक्रोच जनता पार्टीशी (CJP) संबंधित जनहित याचिकेवरुन सुप्रीम कोर्टानं मंगळवारी केंद्र सरकार, इलेक्ट्रॉनिक्स अन् माहिती प्रसारण मंत्रालया, बार काऊन्सिल ऑफ इंडिया आणि सीबीआयला नोटीस पाठवली आहे. या याचिकेत न्यायाधिशांनी केलेल्या मौखित टिप्पण्यांच्या कथित व्यावसायिक वापर आणि त्याचा दुरुपयोगाच्या चौकशीची मागणी केली आहे. सरन्यायाधिश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं या प्रकरणाच्या सुनावणीसाठी १० सप्टेंबर ही तारीख निश्चित केली आहे.
याचिकाकर्ते अॅड. राजा चौधरी यांनी कोर्टाकडं मागणी केली की, "न्यायाधिशांची तोंडी टिप्पणीचा व्यावसायिक उपयोग, ट्रेडमार्क, कमाईच्या उद्देशानं प्रसार आणि अनधिकृत वापराची चौकशी करुन कारवाई केली जावी. याचिकेत विशेष रुपानं कॉक्रोच जनता पार्टीशी संबंधित घडामोडींचा उल्लेख करण्यात आला आहे.
याचिकेत म्हटलं आहे की, निष्पक्ष टीका, लोकशाहीवादी विरोध, व्यंग आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य संविधानांतर्गत सुरक्षित आहे. पण कोर्टाच्या तोंडी टिप्पण्यांचा व्यावसायिक वापर न्यायव्यवस्था आणि न्याय व्यवस्थेत लोकांचा विश्वास कमी करु शकतात.
PILमध्ये बनावट वकील, खोट्या कायद्याच्या पदव्या, दुसऱ्याची ओळख घेऊन वकिली करणे आणि व्यावसायिक मानकांमध्ये झालेली घट यातील आरोपांची सीबीआय किंवा स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. याचिकेत बार काऊन्सिल ऑफ इंडिया आणि विविध न्यायाधिशांच्या टिप्पण्यांचा हवाला देण्यात आला आहे. ज्यामध्ये खोट्या पदवीच्या आधारे वकिली करणाऱ्या लोकांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
हे प्रकरण मे महिन्यात एका सुनावणीवेळी सरन्यायाधिश सूर्यकांत यांनी केलेल्या एका तोंडी टिप्पणीशी संबंधीत आहे. या टिप्पणीनंतर सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी नावानं एक विडंबनात्मक मोहिम सुरु झाली. जी नंतर तरुणांच्या आंदोलनात बदलली. दरम्यान, सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं होतं की, त्यांचं 'कॉक्रोच' विधान हे विद्यार्थी, बेरोजगार तरुण किंवा आंदोलकांसाठी नव्हतं. तर खोट्या आणि बोगस डिग्र्या घेऊन त्या व्यवसायात उतरणाऱ्या लोकांच्या संदर्भात होतं.
यानंतर सीजेपीनं NEET परीक्षेच्या पेपरफुटी आणि घोटाळ्यांशी संबंधीत मुद्द्यांवर देशभरात आंदोलन केलं. नुकतेच या संघटनेचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटलं की, सीजेपी सध्या निवडणुकीच्या राजकारणात उतरण्याऐवजी तरुणांसाठी आणि जबाबदारीशी संबंधित मुद्द्यांवर सामाजिक आंदोलनाच्या रुपात काम सुरु ठेवणार आहे.
झारखंडची राजधानी रांचीमध्ये सध्या सुरु असलेल्या परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधातील तरुणांच्या आंदोलनाला कॉक्रोच जनता पार्टीनं आपला पाठिंबा जाहीर केला आहे. अभिजीत दिपकेंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांपर्यंत एकजुटता दाखवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.