MLA Disqualification News: विधानसभा अध्यक्षांकडे मुलाखतींना वेळ, पण...; सुप्रीम कोर्टाचे गंभीर ताशेरे

Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेच्या संदर्भातील प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Rahul Narwekar and Supreme Court
Rahul Narwekar and Supreme CourtSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi News: 'विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना माध्यमांना मुलाखती देण्यास वेळ आहे, पण आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी घेण्यास वेळ नाही', अशा कडक शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर ताशेरे ओढले.

आमदार अपात्रतेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीवेळी याचिकाकर्त्यांचे वकील आणि ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि महाधिवक्ता तुषार मेहता यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले.

Rahul Narwekar and Supreme Court
MLA Disqualification News : आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणात मोठी अपडेट; राहुल नार्वेकर घेणार 'ही' भूमिका ?

विधानसभा अध्यक्षांकडे काही याचिका नव्याने दाखल झाल्याने या प्रकरणी सुनावणी घेण्यास वेळ गेला, असा युक्तिवाद तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात केला. तर दुसरीकडे अध्यक्ष केवळ वेळकाढूपणा करत आहेत, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

तसेच शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांनी सादर केलेल्या वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत, समाधानी नाही, अशी नाराजी न्यायालयाने व्यक्त केली. तर या प्रकरणाच्या सुनावणीला होणाऱ्या दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबर ही अंतीम तारीख देण्यात आली आहे. तसेच तुम्ही 30 आक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा, अन्यथा आम्ही आमचे वेळापत्रक देऊ, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता पुढच्या सुनावणीवेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर सुधारित वेळापत्रक सादर करणार का ? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Rahul Narwekar and Supreme Court
MLA Disqualification Case : तुमचं वेळापत्रक अमान्य, ३० ऑक्टोबरपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा; सरन्यायाधीशांचा अध्यक्षांना आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.