
New Delhi News : केंद्रातील मोदी सरकारनं आपल्या तिसर्या टर्ममध्ये पुन्हा एकदा धडाकेबाज निर्णयांचा धडाकाच लावला आहे. मे महिन्यातच केंद्र सरकारनं केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी (पेंशनर्स) महत्त्वाचा निर्णय घेताना महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) 2 टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली होती. आता मोदी सरकार (Modi Government) पुन्हा एकदा केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकार दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा निर्णय घेणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सरकार आता आठवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवून देण्याच्या विचाराधीन आहे.
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी (पेंशनर्स) यांच्यासाठी आता DA/DR तीन टक्क्यांनी वाढवण्याच्या निर्णय घेण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जर या निर्णयाला मंजुरी दिली तर केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांसाठीचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत आता 55 टक्क्यांवरून 58 टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
ही वाढ 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार लागू होऊ शकते. मोदी सरकार दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हा महागाई भत्ता( Dearness Allowance) वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. सरकारकडून वाढीव महागाई भत्त्याला मंजुरी देण्यात आली, तर हा तो जुलै 2025 पासून लागू केला जाईल.
केंद्र सरकारच्या वाढीव महागाई भत्त्याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारक मिळून 1.2 कोटी जणांना होत असतो. मोदी सरकार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा फरकही देऊ शकतं. जो ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तर पेन्शनधारकांना महागाईपासून बचाव करण्यासाठी रक्कम दिली जाते. याचा फायदा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारक मिळून 1.2 कोटी जणांना होतो. केंद्र सरकार दिवाळीपूर्वी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महागाई भत्ता वाढवू शकतं.सध्या महागाई भत्ता 55 टक्के आहे. त्यामध्ये 3 टक्के वाढ झाल्यास तो 58 टक्क्यांवर जाईल. हा महागाई भत्ता जुलै 2025 पासून लागू केला जाईल.
फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टनुसार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना तीन महिन्यांचा फरक देखील मिळणार आहे. जो ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो. केंद्र सरकारनं जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली होती.
सातव्या वेतन आयोगानुसार वाढणारा हा अंतिम महागाई भत्ता असणार आहे. सरकारच्या नव्या निर्णयानुसार एखाद्या कर्मचाऱ्याचं मूळ वेतन 50000 रुपये असेल तर महागाई भत्ता 58 टक्के झाला तर महागाई भत्ता 29000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार 1500 रुपयांनी वाढणार आहे. तसेच 30,000 पेन्शन मिळणार असेल तर त्यांना 58 टक्क्यांनुसार डीआर 17400 रुपये मिळणार आहे.
सरकार एका वर्षात दोनवेळा महागाई भत्ता वाढवत असते. जानेवारी ते जून या कालावधीसाठी जानेवारीत तर जुलै ते डिसेंबर या कालावधीसाठी जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढवला जातो. केंद्र सरकारनं मागच्या वर्षी दिवाळीपूर्वी महागाई भत्ता वाढवण्यासंदर्भात घोषणा केली होती.
मोदी सरकारनं तिसर्यांदा सत्तेत परतल्यानंतर गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर 2024 ला महागाई भत्ता वाढवण्यात आल्याची घोषणा झाली होती. यंदा दिवाळी 20-21 ऑक्टोबरला असणार आहे.त्यामुळे केंद्र सरकार हे महागाई भत्ता वाढवण्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकते असा अंदाज अर्थतज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.