Nitish Kumar - bjp .jpg
Nitish Kumar - bjp .jpgSarkarnama

Nitish Kumar Politics: मोदी-शहांचं पुन्हा धक्कातंत्र? नितीशकुमार उपराष्ट्रपती अन् बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री?

BJP Political News : उपराष्ट्रपती पदासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा या तीन नावांचा समावेश आहे. अखेर या तीनपैकी एका नावावर अर्थात नितीश कुमारांचं (Nitish Kumar) नावंही धक्कातंत्र वापरत भाजप उपराष्ट्रपतीपदासाठी ऐनवेळी पुढे आणू शकतो.
Published on

थोडक्यात बातमी:

  1. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा दिल्लीत राजकीय भूकंप निर्माण करणारा ठरला असून, या घडामोडीमुळे मोठ्या उलथापालथीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

  2. राजनाथ सिंह, नितीश कुमार आणि हरिभाऊ बागडे यांची नावे नवे उपराष्ट्रपती होण्यासाठी चर्चेत आहेत; तर शिवसेना (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांनी सप्टेंबरमध्ये मोठे राजकीय घडामोडी होणार असल्याचा दावा केला आहे.

  3. बिहारमध्ये भाजप-नितीश कुमार यांच्यातील तणाव वाढलेला असून, भाजप नितीश यांना उपराष्ट्रपती पदाची ऑफर देऊन बिहारमध्ये सत्ता मजबूत करण्याचा डाव टाकू शकते.

New Delhi News : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीत सोमवारी (ता.21) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर दुसरीकडे जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या राजीनाम्यानंतर लवकरच दिल्लीत मोठ्या राजकीय उलथापालथीचे चर्चा सुरू झाल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान, एक मोठी अपडेट समोर येत आहे. (A political twist in the making? Narendra Modi and Amit Shah reportedly planning to offer the Vice President post to Nitish Kumar, paving the way for BJP to claim the Chief Minister's seat in Bihar ahead of the 2025 elections)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी येत्या सप्टेंबर महिन्यात दिल्लीत मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याचा मोठा दावा केला होता. त्यांनी त्या उलथापालथीची पहिली 'विकेट' धनखड यांची पडली असल्याचंही म्हटलं होतं.

त्याचदरम्यान, खासदार संजय राऊत यांनी भाजपचा एक वरिष्ठ नेता, ज्याचे वय 75 वर्षे आहे, तो उपराष्ट्रपती बनू शकतो, असे संकेत मिळत असल्याचं सांगितलं होतं. तसंच या संभाव्य बदलासाठी एक महत्त्वाचं संविधानिक पद रिकामं करण्यात आलं असावे, अशी शक्यताही बोलून दाखवली होती. महत्त्वाची बाब म्हणजे राजनाथ सिंह यांच्याच कार्यालयातून धनखड यांच्या राजीनाम्याची सूत्रे फिरली होती.

Nitish Kumar - bjp .jpg
NCP SP Politics : शरद पवारांचा पक्ष भाकरी फिरवणार? कोणाला संधी आणि कोणाला बाहेरचा रस्ता, नव्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

पीएम मोदींचे सर्वात विश्वासू केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे नाव उपराष्ट्रपती पदासाठीच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपच्या गोटात नव्या उपराष्ट्रपती पदासाठी एकूण तीन नावांचा विचार सुरू असल्याचं बोललं जात आहे.

उपराष्ट्रपती पदासाठी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार व राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा या तीन नावांचा समावेश आहे. अखेर या तीनपैकी एका नावावर अर्थात नितीश कुमारांचं (Nitish Kumar) नावंही धक्कातंत्र वापरत भाजप उपराष्ट्रपतीपदासाठी ऐनवेळी पुढे आणू शकतो.

Nitish Kumar - bjp .jpg
Next Vice President : PM मोदींचा सर्वात विश्वासू मंत्री होणार उपराष्ट्रपती : त्यांच्याच कार्यालयातून फिरली होती धनखड यांच्या राजीनाम्याची सूत्र ?

पीएम नरेंद्र मोदी सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. हा दौरा आटोपून मायदेशी परतल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच उपराष्ट्र्पती पदाचा उमेदवार निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. मोदी राजनाथ सिंह किंवा नितीश कुमार यां दोघांपैकी कोणाच्या नावाला पसंती देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बिहारच्या निवडणुकीत भाजप नेतृत्वाकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांचा चेहरा पुढे करून निवडणूक लढण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यात जवळपास 20 वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नितीश कुमारांना आता डिमोशन सहन होणार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा आल्यास ते काय भूमिका घेणार, यावर एनडीए आणि त्यांच्या राजकीय भवितव्यासाठीही खूप महत्वाचे ठरणार आहे.

Nitish Kumar - bjp .jpg
BJP Politics: संविधानिक पदावर विराजमान होण्यासाठी पात्रता असेलच असं नाही! भाजपचं राजकारण नेमकं काय खुणावतंय?

बिहारमध्ये भाजप सत्तेचा सेफ गेम खेळण्याची शक्यता आहे. बिहारची निवडणूक केवळ राज्यातील एनडीएचेच भवितव्य ठरवणारी नसून केंद्रातील सरकारवरही परिणामकारक करणारी असणार आहे.आजपर्यंत नितीश कुमारांचे राजकारणही खात्रीचे राहिलेले नाही. ते कधी पलटी मारतील, याची भाजपला अजूनही खात्री नाही. त्यामुळे नितीश कुमारांशी तडजोड करताना नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे त्यांना उपराष्ट्रपतीपदाच्या खुर्चीची ऑफर देऊ शकतात.

बिहारमध्ये सद्यस्थितीत भाजपचे आमदार नितीश कुमारांपेक्षा जास्त आहेत. आगामी निवडणुकीतही अशीच स्थिती राहिल्यास किंवा भाजपच्या जागा वाढल्यास नितीश कुमारांना भाजपकडून नैतिकतेची आठवण करून दिली जाऊ शकते.

विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदावरून भाजपप्रणित एनडीएमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.त्याचमुळे या वर्षाखेरीस होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा आहे.

Nitish Kumar - bjp .jpg
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले ते खरंच... सगळ्याच राजकीय पक्षांचे आमदार, कार्यकर्ते माजलेत; मारकुटे राजकारणी

त्याचवेळी सध्या विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पद भाजपच्या अनेक नेत्यांच्या डोळ्यात खुपताना दिसून येत आहे. त्याचमुळे भाजप नितीश कुमारांना उपराष्ट्रपती पद देत बिहारमध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेचा राजमार्ग मोकळा करण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे.

  1. प्रश्न: उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा का दिला?
    उत्तर: याचे कारण अधिकृतपणे स्पष्ट झालेले नसले तरी, राजकीय उलथापालथीचा भाग असल्याचा अंदाज वर्तवला जातो.

  2. प्रश्न: नवीन उपराष्ट्रपतीपदासाठी कोणाची नावे चर्चेत आहेत?
    उत्तर: राजनाथ सिंह, नितीश कुमार आणि हरिभाऊ बागडे ही तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत.

  3. प्रश्न: संजय राऊत यांनी काय दावा केला आहे?
    उत्तर: त्यांनी सप्टेंबरमध्ये दिल्लीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होईल, अशी भविष्यवाणी केली आहे.

  4. प्रश्न: भाजप नितीश कुमार यांना उपराष्ट्रपतीपद का देऊ शकतो?
    उत्तर: बिहारमध्ये सत्ता एकहाती मिळवण्यासाठी भाजप नितीश यांना दिल्लीत पाठवण्याचा राजकीय डाव टाकू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com