NC Rebel MLA : NC मध्ये प्रचंड बंडखोरी! 10 नाराज आमदारांची बंद दाराआड 3 री बैठक; सत्ता धोक्यात?

NC Political Crisis : NC पक्षात 10 नाराज आमदारांच्या तिसऱ्या बंद दाराआड बैठकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. पक्षातील बंडखोरीमुळे सरकारची सत्ता धोक्यात येणार का? जाणून घ्या.
Omar Abdullah
Omar AbdullahSarkarnama
Published on: 
Updated on: 

जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स (NC) पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पक्षातील नाराज आमदारांनी पुन्हा एकदा गुप्त बैठक घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बुधवारी श्रीनगरमध्ये झालेल्या या बैठकीला 10 ते 15 नाराज आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मंत्रिमंडळ विस्तारानंतर बंडखोर आमदारांची ही तिसरी बंद दाराआड झालेली बैठक आहे.

मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी 27 ऑक्टोबर रोजी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला होता. सरकारमधील रिक्त जागा भरणे आणि मंत्रिमंडळ अधिक मजबूत करणे हा या निर्णयामागचा उद्देश होता. मात्र, मंत्रिपदाची अपेक्षा असलेल्या काही आमदारांना संधी न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे. याच नाराजीतून आमदारांनी एकत्र येत पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा केल्याचे समजते.

Omar Abdullah
PWD Scam : शासकीय निधीवर डल्ला, तब्बल 73 लाखांचा अपहार; तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह तिघे गजाआड

दरम्यान, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि 6 वेळा आमदार राहिलेले मुबारक गुल यांनी दिलेली मुदतही 4 नोव्हेंबर रोजी संपली. मंत्रिपदासह विविध मागण्यांसाठी त्यांनी 27 ऑक्टोबरला पक्ष नेतृत्वाला मुदत दिली होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मात्र स्पष्ट भूमिका मांडण्याचे टाळले.

मुबारक गुल म्हणाले, 'मैं अपने साथियों की भावनाओं का पूरा सम्मान करता हूं, जो लगभग 75 साल पुरानी हैं. ईश्वर ने चाहा तो सही समय पर चीजें सामने आएंगी. मेरे पास कहने के लिए अब और कोई बयान नहीं है.' तसेच आपण लढवय्या असून संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Omar Abdullah
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपचा सोर्स देण्यास जरांगे तयार; पण फडणवीस-शिंदेंसमोर ठेवली 'ही' मोठी अट

या पार्श्वभूमीवर नाराज आमदारांचा गट शुक्रवारी पक्षाचे संरक्षक फारुख अब्दुल्ला यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या बैठकीत किमान 5 ज्येष्ठ आमदार आपल्या मागण्या नेतृत्वासमोर मांडू शकतात. त्यामुळे नॅशनल कॉन्फरन्समधील अंतर्गत संघर्ष मिटणार की पक्षातील बंडखोरी आणखी तीव्र होणार, याकडे जम्मू-काश्मीरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.