PWD Scam : शासकीय निधीवर डल्ला, तब्बल 73 लाखांचा अपहार; तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह तिघे गजाआड

Maharashtra PWD Scam : सार्वजनिक बांधकाम विभागातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या कामांच्या देयकांमध्ये फेरफार करून तब्बल 73 लाखांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Maharashtra PWD Scam
Maharashtra PWD ScamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Palghar News : सार्वजनिक बांधकाम विभागातील 73 लाख 13 हजार 884 रुपयांच्या कथित अपहाराचे प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणी जव्हार पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र शाहिग्राम पवार यांच्यासह अशोक माळगावी आणि एकनाथ वांगड या तिघांना अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रे तयार करून शासकीय निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या कामांच्या देयकांमध्ये फेरफार करून 73 लाख 13 हजार 884 रुपयांचा कथित अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंत्यासह विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या माहितीच्या आधारे जव्हार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तत्कालीन कार्यकारी अभियंता राजेंद्र शाहिग्राम पवार, कर्मचारी अशोक माळगावी आणि एकनाथ वांगड यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना जव्हार न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास जव्हार पोलीस करत आहेत.

Maharashtra PWD Scam
Devendra Fadnavis: फडणवीसांचा OSD असल्याचे सांगून कंत्राटदाराला 3.25 कोटींचा गंडा; आरोपीला अटक, दोन PWD अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार?

दरम्यान, विक्रमगड येथील मे. जिजाऊ कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून शासकीय निधीचा कथित अपहार झाल्याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संबंधित ठेकेदार, त्याचे भागीदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या कागदपत्रांच्या आधारे शासकीय निधीचा अपहार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra PWD Scam
PWD Department News : PWD अधिकाऱ्यांची मनमानी आता चालणार नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'ते' अधिकार केले रद्द

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या कामांच्या देयकांमध्ये फेरफार करून झालेल्या या कथित आर्थिक गैरव्यवहारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांच्या पुढील तपासात या प्रकरणातील आणखी काही बाबी उघड होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.