NEET Exam: शिक्षणक्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणी मोठी अपडेट; 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; खटला सुरू होण्याची तारीखही ठरली

Neet Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकऱणी पोलिस तसेच सीबीआय यांच्या तपासात दिवसागणिक धक्कादायक खुलासे समोर आले होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात नाशिक, पुणे आणि लातूरसह देशभरात अटकेची मोठी कारवाई केली होती.
NEET UG 2026
NEET UG 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News : देशभरात नीट पेपरफुटीमुळे एकच खळबळ उडाली होती.यानंतर नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलं होतं. यानंतर सीबीआयनं या प्रकरणी एकापाठोपाठ एक कारवायांचा धडाका लावताना आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्यासह 14 आरोपींना अटक केली आहे.आता याप्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे.

आता नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या 14 आरोपींविरोधात न्यायालयाने औपचारिक आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यापूर्वी न्यायालयाने सर्व आरोपींना 21 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले होते. यावेळी आरोपींनी त्यांच्यावर असलेले आरोप मान्य करण्यास नकार दिला. यामुळे आता येत्या 25 नोव्हेंबरपासून नीट पेपरफुटीप्रकरणी खटला सुरू होणार आहे.

यापूर्वी नीट पेपरफुटीप्रकऱणी पोलिस तसेच सीबीआय यांच्या तपासात दिवसागणिक धक्कादायक खुलासे समोर आले होते. वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या या नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात नाशिक, पुणे आणि लातूरसह देशभरात अटकेची मोठी कारवाई केली होती. त्यात लातूरमधील प्रसिद्ध मोटेगावकर क्लासेसच्या संचालकांनाही अटक करण्यात आली होती.

न्यायालयात नीट पेपरफुटी प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आलेल्या कलमांमध्ये आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत,फसवणूक तसेच परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित तरतुदींचा समावेश असल्याचं समोर येत आहे. देशभरात शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या नीट पेपरफुटी घोटाळ्याच्या खटल्यात न्यायालयात कसा युक्तिवाद केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत.

NEET UG 2026
BJP Setback : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या बंधूंवर काँग्रेसने सोपवली महत्त्वाची जबाबदारी; तातडीने दिले नियुक्तीपत्र

नीट (NEET-UG 2026) पेपरफुटी प्रकरणामुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर देशभरातील सुमारे 22 ते 23 लाख परीक्षार्थींना मोठा मानसिक ताण आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागला होता. तसेच 3 मे रोजीच्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा एनटीएकडून रद्द करण्यात आली होती. त्यानंतर,20 जून रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकालही जाहीर करण्यात आला आहे.

यानंतर अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात कॉक्रोच जनता पार्टीनं नीट पेपरफुटीप्रकरणी देशाची राजधानी दिल्लीत जंतरमंतरवर मोठं आंदोलन उभारलं होतं. या आंदोलनाची लोण पसरल्यानंतर मोदी सरकारमधील धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली होती.

NEET UG 2026
BJP leader News : भाजपच्या गोटात खळबळ; बड्या नेत्याने कमळाची साथ सोडून धरला विरोधी पक्षाचा हात; राजकीय समीकरणे बदलणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.