वाद पेटला! आता भगवा झेंड्याच्या जागी फडकावला राष्ट्रध्वज

कर्नाटकात शाळा आणि महाविद्यालयांतील हिजाब बंदीवरून राजकारण तापले आहे.
Shivmogga College
Shivmogga College Sarkarnama
Published on
Updated on

बंगळूर : कर्नाटकात (Karnataka) आता हिजाबवरून (Hijab) वाद पेटला आहे. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शाळा (School) आणि महाविद्यालयांमध्ये (Colleges) वादाचे प्रसंग घडत असून तणावाचे वातावरण आहे. शिमोगा येथे महाविद्यालयात राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज फडकावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. आता तेथे पुन्हा राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आहे.

नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या (NSUI) शिमोगा जिल्हा विभागाने गव्हर्नमेंट फर्स्ट ग्रेड कॉलेजमध्ये तिरंगा फडकवला. याच ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी भगवा झेंडा फडकावला होता. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष विजय कुमार आणि राज्य चिटणीस एच.एस.बालाजी हे तिरंगा घेऊन कॉलेजमध्ये गेले. तिथे त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत तिरंगा फडकावला. नंतर त्यांना राष्ट्रगीत म्हटले.

शिमोगा येथील महाविद्यालयात भगवा झेंडा फडकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येथील एका महाविद्यालयात एक मुलगा खांबावर चढून राष्ट्रध्वजाच्या जागी भगवा ध्वज फडकावत असल्याचे या व्हिडीओत दिसत होते. इतर विद्यार्थी या वेळी जल्लोष करताता दिसत होते आणि त्यावेळी जमलेले विद्यार्थी हे भगवे झेंडे आणि उपरणे घेऊन होते. दरम्यान, शिमोग्यात दगडफेकीचे प्रकार घडल्याने जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे.

बुरखा बंदीच्या निर्णयावरून राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी राज्यातील शाळा व महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली होती. बोम्मई यांनी याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.राज्यातील काही शाळा व महाविद्यालयांमध्ये मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा (Hijab) घालून येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

Shivmogga College
दोन वेळा तुरुंगात जाऊन आलात, आता तरी सुधरा! केसरकरांचा राणेंना शहाणपणाचा सल्ला

विद्यार्थी शिक्षक आणि शाळा व महाविद्यालयांच्या व्यवस्थापन तसेच कर्नाटकमधील नागरिकांनीही राज्यात शांतता राखावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. या प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचेही बोम्मई यांनी सांगितले. दरम्यान, काही महाविद्यालयांमध्ये मंगळवारी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. त्याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.

Shivmogga College
जामीन मिळताच 24 तासांत 'आयसीयू'तील आमदार नितेश राणेंना रुग्णालयातून डिस्चार्ज

दरम्यान, उडपी येथील महात्मा गांधी मेमोरियल कॉलेजमध्ये बुरखा घातलेल्या विद्यार्थींनींचा एक गट आणि भगव्या रंगाचे उपरणे घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या गट समोरासमोर आले होते. त्यावेळी उपरणं घेतलेल्या विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पसमध्ये घोषणाबाजी करत निदर्शने केली होती. यामुळे महाविद्यालयाच्या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. हे प्रकरण आता उच्च न्यायालयात गेले आहे. बुरखा वादावर सहा विद्यार्थिनींनी याचिका दाखल केली आहे. वर्गात बुरखा घालण्याचा अधिकार देण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थिनींनी याचिकेद्वारे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com