OBC Protest Viral Video : भाजप आमदाराला तोंडावर सुनावलं, तू गाढव आहेस..., युवकाच्या व्हिडिओ व्हायरल!

BJP MLA Devendra Jain viral video latest update : ओबीसींना पुन्हा 27 टक्के आरक्षण लागू करण्यासाठी आंदोलक आक्रमक झाले आहे. आंदोलकांनी भाजप आमदारावर टीका केली आहे.
BJP MLA Devendra Jain
BJP MLA Devendra Jain sarkarnama
Published on: 
Updated on: 

MP News : ओबीसी आंदोलनातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये भाजप आमदाराला तू गाढव आहेस. मी पदवीधर आहे, असे एक युवक बोलताना दिसत आहे. युवकाच्या वक्तव्यानंतर तेथे उपस्थित इतर आंदोलकांनी टाळ्या वाजवल्या, तर, भाजप आमदाराने तत्काळ तिथून निघून गेला.

हा व्हिडिओ मध्य प्रदेशमधील आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसींचे आरक्षण 27 टक्क्यांवरून पुन्हा 14 टक्के करण्यात आले आहे. त्यानंतर कोर्टाच्या निर्णयानंतर ओबीसी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

भाजप आमदार देवेंद्र जैन हे या आंदोलनात एका युवकाशी वाद घालत होते. युवकाने तुम्ही गाढव आहेत मी ग्रॅज्युएट आहे, असे म्हटले.

आंदोलनाच्या दरम्यान आमदार जैन तेथे आले. त्यांनी 27 टक्के आरक्षण कमी करण्याचा निर्णय कोर्टाचा आहे, असे सांगत आंदोलकांचे आंदोलन चुकीचे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.तसेच युवकाला तू गाढव आहेस का? असा प्रश्न केला. त्यावर युवकाने त्यांना प्रत्युतर देत तुम्हीच गाढव आहात, असे म्हटले.

BJP MLA Devendra Jain
IAS transfer : 23 IAS अधिकाऱ्यांचे तडकाफडकी ट्रान्सफर! MP च्या CM सचिवपदी सुखबीर सिंह; प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

आंदोलक आक्रमक

ओबीसींना पुन्हा 27 टक्के आरक्षण लागू करण्यासाठी आंदोलक आक्रमक झाले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या विरोधात ते आंदोलन करत आहेत. काँग्रेसने 14 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून 27 टक्के केली होती. मात्र, मध्य प्रदेश हायकोर्टाने हे आरक्षण कमी करत पुन्हा 14 टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे ओबीसी संघटनांकडून आंदोलन सुरू आहे.

BJP MLA Devendra Jain
IAS officer : मध्य प्रदेश केडरचे दोन आयएएस अधिकारी केंद्रात; एकाची घरवापसी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com