BJP News : राज्यपालपदी नियुक्ती होताच म्हणाले, भाजपचे मतदान वाढविण्यासाठी करणार प्रयत्न! नव्या वादाला फुटले तोंड

Braj Mohan Ram, Odisha Governor, Odisha politics : ओडिशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बीजेडीने ब्रज मोहन राम यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Braj Mohan Ram
Braj Mohan RamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Braj Mohan Ram controversy : देशातील काही राज्यांमध्ये नुकतीच राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये भाजप नेते ब्रज मोहन राम यांची ओडिशाच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीनंतर त्यांच्या एका विधानाने मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्यपालपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भाजपचे मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विधान ब्रज मोहन राम यांनी केले आहे.

ब्रज मोहन राम हे मुळचे बिहारचे आहेत. राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर रांची येथे मीडियाशी बोलताना त्यांनी केलेले हे विधान चर्चेत आले आहे. ते म्हणाले, झारखंडमध्ये मी भाजपच्या दलित मोर्चाचा अध्यक्ष होतो. तिथेही संघटन मजबूत करण्याचे काम केले. ओडिशामध्येही SC मोर्चा आहे. राज्यपालपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर हा मोर्चा अधिक सक्रिय करण्यासाठी मी काम करेन.

भाजपसाठी अधिक मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न असेल, असेही ब्रज मोहन राम म्हणाले आहेत. आपण भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, तीन वेळा उमेदवारी नाकारण्यात आली तरीही आपण भाजपसोबतच राहिलो. इतर उमेदवारांच्या विजयासाठी काम केले. या कामाची दखल घेतली.

Braj Mohan Ram
Vinod Tawde news : भाजपला केवळ 3 जागा, पक्षाने जनतेचा कौल स्वीकारला! प्रभारी असताना झालेल्या पराभवाकडे बोट दाखवत विनोद तावडेंचा काँग्रेसवर घाव

ओडिशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बीजेडीने ब्रज मोहन राम यांच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली. पक्षाचे प्रवक्ते लेनिन मोहंती म्हणाले, ओडिशामध्ये भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राज्यपाल म्हणाले आहेत, हे ऐकून धक्का बसला. राज्यपालांनी निष्पक्ष राहिले पाहिजे, या तत्त्वाला छेद देणारे हे विधान आहे.

Braj Mohan Ram
BJP politics : विरोधक एकवटलेले असतानाच भाजपने दिला दणका; इंडिया आघाडीतील प्रमुख पक्षाचे तीन आमदार फोडले...

दरम्यान, ब्रज मोहन राम हे पहिल्यांदा १९९१ मध्ये बिहार विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर १९९६ मध्ये पहिल्यांदाच खासदार बनले. त्यानंतर १९९८ च्या मध्यावधी निवडणुकीतही ते विजयी झाले होते. त्यांनी १९९९ मध्ये पुन्हा आपली ताकद दाखवत तिसऱ्यांदा लोकसभा गाठली होती. मात्र, या निवडणुकीनंतर त्यांना पक्षाने पुन्हा तिकीट दिले नाही. पक्षांतर्गत विविध पदे त्यांनी भूषविली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com