

Rajasthan News : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपमधील अंतर्गच गटबाजीवर सनसनाटी भाष्य केले आहे. गेहलोत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यात राजस्थानचं नुकसान करण्यासाठी स्पर्धा लागली आहे. मोदी आणि वसुंधरा राजे यांच्यात जुने भांडण सुरू आहे, असे म्हणत गेहलोत यांनी मोदी-राजे यांच्यात जुना संघर्ष असल्याचे म्हटले आहे. (Latest Marathi News)
गेहलोत म्हणाले, "जेव्हा गुजरातने नर्मदा नदीचं पाणी राजस्थानला दिले. त्यानंतर राजे यांनी सांचोरमध्ये बैठक बोलावली होती. त्याच वेळी गुजरातमध्ये राजस्थानच्या सीमेपासून एक किलोमीटर दूर पाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रेय घेण्यासाठी मोदी सभा घेत होते. तेव्हापासून मोदी आणि राजे यांच्यातील वाद सुरू आहे. या दोघांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा फटका राजस्थानच्या जनतेला सहन करावा लागत आहे. राजेंच्या महत्त्वाकांक्षी ईआरसीपी योजनेला मोदी राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करत नाहीत, यामुळे त्यांच्यातील संघर्षामुळे राजस्थानचं अतोनात नुकसान होत आहे.
यंदाच्यावेळी भाजपने वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केलेले नाही. तरीही वसुंधरा राजे गटात मौन दिसत आहे. राज्याच्या भाजपमधून वसुंधरा राजे पूर्णपणे बाजूला झाल्या आहेत, अशी राजस्थानच्या राजकारणात चर्चा आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी जाणूनबुजून विधाने करून भाजपमधील गटबाजीला डिवचल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. गेहलोत यांनी भाजपच्या कमकुवत बाजूवर बोट ठेवले आहे. आता भाजप हायकमांड वसुंधरा राजे यांच्या समर्थकांना उमेदवारी देणार की नाही, हेच पाहणे बाकी असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, भाजपने पाच वर्षे सरकारला अडचणीत आणले. सरकार पाडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न होता. इथे राज्य सरकार पारदर्शक पद्धतीने चालवण्याबरोबरच, उत्तम योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहे. मात्र, विरोधक सत्तेत येण्याच्या पात्रतचे नाहीत. लोकशाहीत निवडून आलेली सरकारे पाडली जात असतील, तर निवडणुका घेण्याचा अर्थ काय? या लोकांना आगामी काळात निवडणुका घ्यायच्या आहेत का? असा सवालही गेहलोत त्यांनी केला.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.