...तर काँग्रेस नेते व विरोधकांना क्रेनला लटकवून फाशी दिली असती!

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
C. T. Ravi
C. T. RaviFile Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांतील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केले जात आहे. आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतात तालिबान असते तर काँग्रेस नेते व इतर विरोधकांना क्रेनला लटकवून फाशी दिली असती, असं विधान त्यांनी केलं आहे.

रवी हे कर्नाटकमधील बडे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. आरएसएस आणि भाजप हिटलरच्या वंशातील आहे. भाजप तालिबानी आहे. त्यांच्यापासून सावध राहावे, असं वक्तव्य सिध्दरामय्या यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना रवी यांनीही तालिबानचा उल्लेख करत विरोधी पक्षातील नेत्यांना इशारा दिला आहे.

C. T. Ravi
कन्हैयाच्या प्रवेशाआधीच काँग्रेसमध्ये कलह सुरू

रवी म्हणाले, असं म्हणतात की तुम्ही म्हातारे झाल्यानंतर तुमची दृष्टी कमी होते. सिध्दरामय्या यांनाही हे लागू होतं. त्यामुळंच त्यांना तालिबान आणि आरएसएस एकच वाटत आहे. त्यांची दृष्टी चांगली असती तर त्यांना दोघांमधील फरक समजला असता.

तालिबान सत्तेत असते तर सिध्दरामय्या जिवंत राहिले असते का? तिथे विरोधकांना क्रेनला लटकवून फाशी दिली जाते. जर भारतात तालिबान असते तर विरोधकांची काय स्थिती झाली असतील, याचा विचार करा. भाजप-आरएसएस तालिबानसारखे असते तर विरोधकांना क्रेनला लटकवले असते, असे रवी म्हणाले. भाजप नव्हे तर काँग्रेसच तालिबान आहे कारण त्यांचे संबंधित तालिबानी विचारांच्या एआयएमआयएम, पीएफआय या संघटनांशी संबंध आहेत, अशी टीकाही रवी यांनी केली.

C. T. Ravi
काँग्रेसला मोठा धक्का! सिद्धूंचा प्रदेशाध्यपदाचा तडकाफडकी राजीनामा

काय म्हणाले होते सिध्दरामय्या?

भाजपही खोटेपणाचा कारखाना आहे. या कारखान्यात केवळ खोटेपणाचे उत्पादन आणि मार्केटिंग होते. आपण याची तुलना गोबेल्स नितीशी करू शकतो. हिटलरच्या सत्तेत या नीतीचा अवलंब केला जात होता. हिटलरचा गोबेल्स नावाचा मंत्री होतो. तो केवळ खोट्या गोष्टी पसरवत असे. आरएसएस आणि भाजप हे हिटलरच्या वंशाचे आहेत. भाजप तालिबानी असून त्यांच्यापासून सावध राहावे, असं सिध्दरामय्या म्हणाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.