
New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सची रेड पडल्याच्या बातम्या सतत असतात. ना खाऊंगा, ना खाने दुंगा... या घोषणेची आठवण मोदींसह भाजपचे नेतेही सातत्याने करून देतात. एका कार्य़क्रमात व्यावसायिक त्याचे उत्पन्न सांगण्यास घाबरत असल्याचे जाणीव पंतप्रधान मोदींना होते. त्यानंतर मोदींना दिलेला दिलासा चर्चेचा विषय बनला आहे.
केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंतप्रधानांना या योजनेच्या लाभार्थ्यांशी दिल्लीत संवाद साधला. तसेच यावेळी लाभार्थ्यांनी या योजनेमुळे आपले आयुष्य कसे बदलले, याचे अनुभव सांगितले. या योजनेतून आतापर्यंत 33 लाख कोटी कर्ज वाटप झाल्याची माहितीही मोदींनी यावेळी दिली.
केरळमधील गोपी कृष्णन यांनीही या कार्यक्रमात आपली सक्सेस स्टोरी सांगितली. या योजनेमुळे आपले नशीब पालटल्याचे ते म्हणाले. दुबईत असताना या योजनेविषयी माहिती मिळाली. त्यानंतर काही दिवसांत भारतात आलो आणि मुद्रा लोनसाठी अर्ज केला आणि त्यानंतर लोन मिळाले, असे गोपी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींना त्यांना याविषयी अधिक खोदून विचारले. दुबईतून काम सोडून आल्यानंतर आई खूप टेन्शनमध्ये होती. मुलगा कर्ज फेडू शकेल का, अशी भीती तिला होती. पण आता ते महिन्याला अडीच लाख रुपये कमवत असल्याचे गोपी यांनी सांगितले. त्याआधी पंतप्रधान मोदींनीच त्यांना सूर्य़घर योजनेतून किती कमावता, असा प्रश्न विचारला होता.
पंतप्रधानांच्या प्रश्नाला उत्तर देताना गोपी कचरत होते. हे लक्षात येताच मोदींनी त्यांची फिरकी घेतली. घाबरू नका. मी अर्थमंत्र्यांना सांगोत. तुमच्या घरी इन्कम ट्रक्सवाले येणार नाहीत, असे पंतप्रधान शेजारी बसलेल्या अर्थमंत्र्यांकडे हात दाखवत म्हणाले. त्यानंतर गोपी यांच्यासह उपस्थितांना हसू आवरले नाही. पंतप्रधानांनी हा दिलासा दिल्यानंतर गोपी यांनी आपले उत्पन्न सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.