

TMC MP: तृणमूल काँग्रेसच्या फुटलेल्या २० खासदारांच्या अपात्रतेबाबतचा प्रलंबित असलेल्या विषयावर आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अंतिम निकाल दिला. येत्या सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेश सुरु होत आहे. या अधिवेशनापूर्वीच लोकसभा अध्यक्षांनी हा प्रश्न निकाली काढला. त्यामुळं आता अधिवेशनादरम्यान या खासदारांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
तृणमूल काँग्रेसमधून २० खासदारांनी बंडखोरी करत सुरुवातीला आपला वेगळा गट निर्माण केला होता. त्यानंतर हा गट त्यांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) या कोणालाही माहिती नसलेल्या पक्षात विलिन केला. त्यामुळं आचनक या पक्षाची राष्ट्रीय राजकारणात ताकद वाढली. या २० खासदारांच्या पक्ष प्रवेशाला अध्यक्षांनी मान्यता दिली तसंच लोकसभेत त्यांना वेगळ्या ठिकाणी बसण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आली. त्यामुळं आता लोकसभेमध्ये विरोधकांच्या एरियामध्ये जिथं तृणमूल काँग्रेसचे उर्वरित खासदार नेहमी बसतात, त्यांच्यामध्ये या बंडखोर खासदारांना बसण्याची गरज नाही. त्यांना आता एनडीएसोबत असल्यानं सत्ताधाऱ्यांच्या एरियात बसता येणार आहे.
तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या प्रवेशामुळं NCPI हा पक्ष रातोरात एनडीएतील मित्रपक्षांपैकी भाजपनंतर सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. एनडीएतील शिवसेना (शिंदे), तेलगू देसम पार्टी, जनता दल युनायटेड या पक्षांपेक्षा हा पक्ष मोठा ठरला आहे. या पक्षाचा सध्या एकही आमदार नाही, नगरसेवक नाही की कोणी निवडून आलेला लोकप्रतिनिधी नाही. पण अचानक २० खासदार या पक्षाला भेट म्हणून मिळाल्यानं वेगळीच राजकीय तडजोड आणि समीकरण आता केंद्रात पाहायला मिळालं आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या पॉश अशा कार्यालयावर आज सरकारकडून बुलडोझर चालवण्यात आला. करोडो रुपये खर्चुन बांधलेलं हे कार्यालय आज पाडण्यात आलं. यावरुनही अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी या कारवाईचा निषेध केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.