1 July New Rules: 1 जुलैपासून खिशाला फटका? 5 मोठे बदल! रेल्वे, आधार, पासपोर्ट ते क्रेडिट कार्ड; जाणून घ्या कोणते नियम बदलणार

New Rules From July 1: १ जुलै २०२६ पासून एलपीजी दर, आधार अपडेट, पासपोर्ट शुल्क, रेल्वे दंड नियम आणि HDFC क्रेडिट कार्डच्या अटींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या नव्या नियमांचा सर्वसामान्यांच्या खर्चावर थेट परिणाम होऊ शकतो.
New Rules From July 1
New Rules From July 1Sarkarnama
Published on
Updated on

देशभरात १ जुलै २०२६ पासून अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित नियम बदलण्याची शक्यता आहे. या नव्या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर आणि रोजच्या खर्चावर होऊ शकतो.

नवीन नियमांमध्ये बँकिंग, रेल्वे, गॅस सिलिंडरचे दर, पासपोर्ट शुल्क, आधार अपडेट, क्रेडिट कार्ड सुविधा तसेच UPIद्वारे PF काढण्यासारख्या सेवांचा समावेश असू शकतो. याशिवाय केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) वाढीबाबतही महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तेल कंपन्यांकडून एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या नव्या दरांची घोषणा होऊ शकते. तसेच काही बँका क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल लागू करणार आहेत. रेल्वेच्या दंड नियमांमध्येही बदल अपेक्षित असून, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई होऊ शकते.

UIDAI कडून आधार अपडेट सेवा काही काळासाठी मोफत करण्यात येण्याची शक्यता आहे, तर पासपोर्ट शुल्कात वाढ होण्याचीही चर्चा आहे. त्यामुळे १ जुलैपासून लागू होणाऱ्या या नव्या नियमांचा थेट परिणाम नागरिकांच्या मासिक बजेटवर होणार असल्याचे मानले जात आहे. नेमके कोणते नियम बदलणार आणि त्याचा तुमच्या खिशावर किती परिणाम होणार, हे सविस्तर जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

1)आधार कार्डधारकांसाठी मोठा दिलासा

आधार कार्डधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. UIDAI ने १ जुलै २०२६ पासून पुढील सहा महिन्यांसाठी आधार अपडेट सेवा मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे.यामुळे नागरिकांना आधारमधील विविध माहिती कोणतेही शुल्क न भरता अपडेट करता येणार आहे. यापूर्वी नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर किंवा ई-मेल आयडीमध्ये बदल करण्यासाठी ७५ रुपये शुल्क आकारले जात होते. विशेषतः पत्ता बदल, मोबाईल नंबर अपडेट किंवा इतर वैयक्तिक माहिती दुरुस्त करू इच्छिणाऱ्यांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.

New Rules From July 1
Teacher News: ग्रामीण शाळांना मोठा दिलासा! 9 वी 10 वीच्या 20 विद्यार्थ्यांसाठी तीन शिक्षक मंजूर; काय आहे नवा सुधारित निकष

2)पासपोर्ट मिळवणे महाग होणार

परराष्ट्र मंत्रालयाने तब्बल दशकभरानंतर पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन नियमांनुसार, ३६ पानांच्या सामान्य पासपोर्टसाठी आकारले जाणारे शुल्क १,५०० रुपयांवरून थेट २,५०० रुपये करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन पासपोर्ट किंवा पासपोर्टचे नूतनीकरण करणाऱ्यांना आता १,००० रुपये अधिक मोजावे लागतील. तत्काळ (Tatkal) सेवेसाठीही शुल्कात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ३,५०० रुपये असलेले शुल्क आता ५,००० रुपये होणार आहे. त्यामुळे तातडीने पासपोर्ट आवश्यक असणाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे. ६० पानांचा जंबो पासपोर्ट घेणाऱ्यांनाही मोठा फटका बसणार आहे. या पासपोर्टचे शुल्क वाढवून ६,००० रुपये करण्यात आले आहे. पासपोर्ट सेवांमधील या वाढीव शुल्कामुळे परदेश प्रवास किंवा शिक्षणासाठी तयारी करणाऱ्या नागरिकांच्या खर्चात वाढ होणार असल्याचे मानले जात आहे.

New Rules From July 1
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम! किचन कसं असावं?

3)HDFC क्रेडिट कार्डचे नियम बदलणार

१ जुलै २०२६ पासून HDFC बँकेच्या Regalia Gold आणि Diners Club Privilege कार्डधारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. एअरपोर्ट लाउंज सुविधेसंदर्भातील अटी अधिक कडक करण्यात आल्या आहेत. देशांतर्गत एअरपोर्ट लाउंज प्रवेशासाठी खर्चाची किमान अट निश्चित केली आहे. Regalia Gold क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत लाउंज सुविधा मिळवण्यासाठी प्रत्येक तिमाहीत ठराविक रक्कम खर्च करावी लागणार आहे. पुढील तिमाहीत देशांतर्गत एअरपोर्ट लाउंजचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी मागील तिमाहीत किमान ६० हजार रुपयांचे व्यवहार केलेले असणे आवश्यक आहे. ही अट पूर्ण केल्यासच ग्राहकांना कॉम्प्लिमेंटरी लाउंज प्रवेशाची सुविधा मिळेल या बदलांमुळे नियमित प्रवास करणाऱ्या ग्राहकांवर थेट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्ड वापराच्या पद्धतीतही बदल होऊ शकतो. त्यामुळे HDFC क्रेडिट कार्डधारकांनी नवीन नियम आणि अटी वेळेत समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

New Rules From July 1
बचत गटातील महिलांना मिळणार 12 हजारांचे मानधन! सरकारची नवी योजना

4) रेल्वे दंड नियमांमध्ये बदल

रेल्वे प्रवाशांसाठी दंडाच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात येणार आहे. विनातिकीट प्रवास आणि नियमभंग रोखण्यासाठी दंडाची रक्कम वाढविण्याता आला आहे. यापूर्वी विनातिकीट प्रवासासाठी आकारला जाणारा दंड २५० रुपये होता, मात्र आता तो वाढवून ५०० रुपये करण्यात आला आहे. महिलांच्या राखीव डब्यात अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तब्बल २,५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. रेल्वेतील शिस्त राखणे आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे बदल करण्यात आल्याचे सांगितले जात असून, १ जुलैपासून हे नियम देशभर लागू होणार आहेत.

New Rules From July 1
TET Exam 2026: दादा भुसे यांच्या हस्तक्षेपानंतर TET नियमात बदल; हिजाब वादावर पडदा, धार्मिक स्वातंत्र्याचा सन्मान करणारा निर्णय

5) LPG, CNG आणि PNG च्या दरांमध्ये बदल

१ जुलै २०२६ पासून एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला कंपन्या इंधनाच्या किंमतींचा आढावा घेतात आणि त्यानुसार नवीन दर जाहीर केले जातात. यावेळी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल होऊ शकतो. त्याचबरोबर वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या सीएनजी आणि घरगुती वापरातील पीएनजीच्या दरांमध्येही वाढ किंवा कपात होण्याची शक्यता आहे. याशिवाय विमान इंधनाच्या (ATF) दरांचाही पुनर्विचार केला जाणार असून, त्याचा थेट परिणाम विमान प्रवासाच्या भाड्यावर होऊ शकतो. इंधन दर वाढल्यास विमान कंपन्या तिकीट दर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com