

PM Modi Speech: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेतील भाषण टाळून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावानिमित्त ते बोलत होते. यावेळी काँग्रेसनं सरकारला अमेरिकेसोबत केलेल्या कारारावरुन घेरलं होतं. याचं उत्तर देताना मोदींनी काँग्रेसवर आरोपांना उत्तर देताना म्हटलं की, जेव्हा एखादा विकसित देश, विकसनशील देशाशी करार करतो तेव्हा ती मोठी गोष्ट असते. त्याचबरोबर काँग्रेसच्या आधीच्या नेत्यांमध्ये देशाबाबत कुठलंही व्हिजन नव्हतं, असं म्हटलं.
पंतप्रधानांचं भाषण सुरु झाल्यानंतर समोरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेसचे इतर खासदार जोरदार घोषणाबाजी करत होते. विरोधकांना बोलू द्या, हुकुमशाही बंद करा अशा घोषणा स्वतः खर्गे देत होते. यामुळं पतंप्रधानांना भाषण करताना अडथळे येत होते. त्यातच मोदींनी खर्गेंना टोमणा मारताना आता तुमचं वय झालं आहे, त्यामुळं तुम्ही उभं राहऊन घोषणा देण्यापेक्षा खाली बसून घोषणा द्याव्यात असं मोदी म्हणाले. पण मोदी हे एकून घेण्याच्या मनस्थितीत नसल्यानं विरोधकांनी अखेर पंतप्रधानांचं भाषण सुरु असतानाच राज्यसभेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते सभागृहातून बाहेर पडले.
यानंतर PM मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसच्या यापूर्वीच्या पुढाऱ्यांमध्ये कुठल्याही स्वरुपाच देशासंबंधीचं व्हिजन नव्हतं असं मोदी म्हणाले. तसंच काँग्रेसच्या धोरणांमुळेच आज देशाची वाट लागल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर नुकताच अमेरिकेसोबत झालेल्या करारावरुन काँग्रेसनं मोदी सरकारनं कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. या करारावर चिंता व्यक्त करताना या कराराचे सगळे तपशील केंद्र सरकारनं जाहीर करावेत असं मोदींनी म्हटलं. या काराराचे शेतकरी, व्यापारी आणि देशांतर्गत उद्योगांवर काय परिणाम होतील याची माहितीही सरकारनं द्यावी अशी मागणी काँग्रेसनं केली होती. पंतप्रधान मोदी घाबरले असून त्यांनी घाबरुन ट्रम्प यांच्यासोबत तडजोड करार केल्याच आरोप राहुल गांधी यांनी केला होता. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या करारावर अचानक कशा सह्या झाल्या? या कराराची माहिती आपल्या सरकारनं न देता ट्रम्प यांनीच कशी काय जाहीर केली? असे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले होते.
याच आरोपांना उत्तर देताना मोदींनी राज्यसभेत म्हटलं की, विरोधक थकले आणि निघून गेले पण कधी ना कधी त्यांना याचं उत्तरच द्याव लागेल. जगातील कोणताही देश आपल्याशी डील करण्यासाठी पुढे येत नव्हता. तुम्ही प्रयत्न केला असेल की त्यांच्या मागे मागे फिरण्याचा पण कोणीही तुमच्याकडं बघितलंही नसेल. काय स्थिती असेल देशाची. जगातील देश भारतासोबत असचं डील करत नाहीत त्यामागे महत्वाची कारणं आहेत. विकसित देश एका विकसनशील देशाशी डील करतो तेव्हा ती आपल्यामध्येच अर्थजगतासाठी एक मोठी गोष्ट असते. माझ्यासाठी ही नवी गोष्ट नाही, कारण मी गुजरातचे मुख्यमंत्री असताना आम्ही व्हायब्रंट समिट करत होतो. यापूर्वी लाल किल्ल्यावरुन काँग्रेसच्या पंतप्रधानांची भाषणं ऐका या भाषणांचं विश्लेषण केल्यावर तुमच्या लक्षात येईल की, त्यांच्याजवळ कुठलाही विचार नव्हता, व्हिजन नव्हतं किंवा कुठलीही इच्छाशक्तीही नव्हती. त्याचाच परिणाम म्हणून देशाला इतकं भोगावं लागलं आहे.
जग काँग्रेसच्या काळात देशाकडं ज्यादृष्टीनं बघत होता ती देशाची प्रतिमा बदलण्यासाठी आमची शक्ती खर्च होत आहे. त्यासाठी आम्ही फ्युटर रेडी पॉलिसीजवर भर दिला आहे. आज आपण पाहतोय की देश नितीच्या आधारावर चालत आहे. ज्याप्रकारे जगाचं भारताप्रती आकर्षण वाढलं आहे. यातही जग भारताच्या टॅलेंटचं महात्म समजत आहे. आज आपल्याकडं जगातील सर्वात मोठं टॅलेंट पूल आहे. जगात आज जी आव्हानं आहेत त्याचा तोडगा सुचवणारा भारत हा आशेचा किरण बनला आहे. भारताच्या विकासाच्या विकासदरात मोठी वाढ आणि कमी महागाई हा विशेष संयोग आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा आपण जगातील ६ वी अर्थव्यवस्था होतो. तेव्हा या लोकांनी देशाची अशी हालत करुन ठेवली की, त्याला ११ व्या क्रमांकावर पोहचवलं पण आज आपण क्रमांक ३ वर जाण्यासाठी वेगानं निघालो आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.