

Mumbai News : राज्यात गेल्या तीन महिन्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत आहेत. पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये निमशहरी भागातील 288 नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर डिसेंबर ते जानेवारी महिन्यात शहरी भागातील 29 महापालिकेची निवडणूक पार पडली. या नंतर आता दोन दिवसातच राज्यातील 12 जिल्हा परिषद व 225 पंचायत समित्यांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांचा कस लागणार आहे. त्यातच आता निवडणूका पार पडल्यानंतर 15 ते 22 फेब्रुवारी दरम्यान राज्य विधिमंडळाचे 15 आमदार लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत.
लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जात असलेल्या या शिष्टमंडळात सत्ताधारी महायुतीमधील भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना, काँग्रेस, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा समावेश आहे. लंडनमधील शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय कार्यपद्धतीचा अभ्यास हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.
विधिमंडळातील 15 आमदार लंडनच्या अभ्यास दौऱ्यात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचाही अभ्यास करणार आहेत. भाजपकडून (BJP) विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई यांचा समावेश आहे. या भेटीत शहरी व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला जाणार आहे.
राज्य विधिमंडळातील लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर जाणारे आमदारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. बाबासाहेब देशमुख, परिणय फुके, विक्रम पाचपुते, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे, स्नेहा दुबे, विक्रांत पाटील, अमित गोरखे, विक्रम काळे, विश्वजीत कदम, वरुण सरदेसाई, मनिषा कायंदे, सुमित वानखेडे, योगेश टिळेकर यांचा समावेश आहे.
येत्या चार दिवसात गेल्या तीन महिनापासून राज्यात सुरु असलेला निवडणुकीचा धुरळा शांत होताच 15 आमदार अभ्यासासाठी लंडनला रवाना होणार आहेत. यावरून राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.