Parliament Security Breach : संसद घुसखोर आरोपीच्या घरी पोलिस, आई-वडील-भावाची कसून चौकशी; म्हणाले...

Lalit Jha Parliament incident : ललितला व्हायचे होते डॉक्टर; सात लाख रुपये फी नव्हती, कोलकात्यात पूजापाठ करून उदरनिर्वाह करायचा...
Parliament Security Breach :
Parliament Security Breach :Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News : संसद घुसखोरी प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. काल (18 डिसेंबर) एटीएसचे दोन अधिकारी बहेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामपूर उदय गावात या प्रकरणातला आरोपी ललित झा याच्या घरी पोहोचले. सायंकाळी पाचच्या सुमारास दोघेही ललितच्या घरी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी कसून चौकशी केली. ललितचे वडील देवानंद झा, आई मंजुळा देवी आणि लहान भाऊ हरिदर्शन उर्फ ​​सोनू यांच्याकडे पोलिसांनी ललितबद्दल कसून चौकशी केली. (Latest Marathi News)

Parliament Security Breach :
Parliament Security Investigation : संसद घुसखोरीवरुन मोठा खुलासा; सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारची गंभीर चूक!

ललितच्या वडिलांनी सांगितले की, 'तपास यंत्रणेचे दोन अधिकारी संध्याकाळी 5 वाजता आमच्या घरी पोहोचले. बहेडा पोलिस ठाण्यातील एक पोलिस अधिकारीही त्यांच्यासोबत होता. या अधिकाऱ्यांनी ललितची एक तासाहून जास्त वेळ चौकशी केली. तसेच जंगम मालमत्तेची चौकशी केली. बहेडा पोलिस ठाण्याचे एसएचओ बी.के. ब्रिजेश यांनी सांगितले की, 'दोन एटीएस निरीक्षक दर्जाचे अधिकारी ललितच्या घरी पोहोचले होते. त्यांनी त्याच्या वडिलांची चौकशी करून माहिती घेतली.'

Parliament Security Breach :
Nagpur Winter Session: हिवाळी अधिवेशन लांबणार की गुंडाळणार ?

याआधीही पोलिसांनी ललितच्या वडिलांची चौकशी केली होती. काही महिन्यांपूर्वी ललितने खासगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी वडिलांकडे 7 लाख रुपये मागितले होते. तात्काळ प्रवेश घेण्यासाठी तीन लाख रुपये मागितले होते. पण वडिलांनी आर्थिक परिस्थितीचे कारण देत पैसे देण्यास नकार दिला होता. ललितच्या वडिलांनी याबाबत सांगितले की, 'तो कसा तरी कोलकात्यात पूजापाठ करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.'

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com