PM Modi Video : राहुल गांधी-स्टॅलिन भेटीआधी पंतप्रधान मोदींकडून व्हिडिओ पोस्ट; म्हणाले, संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबध्द...

Narendra Modi, Rahul Gandhi, MK Stalin : आमच्यासाठी देशहित सर्वोपरी आहे. काही लोकांसाठी जेव्हा देशहितापेक्षा पक्षहित मोठे होते, तेव्हा त्याचे परिणाम नारी शक्ती आणि देशाला भोगावे लागतात, अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली.
MK Stalin, PM Narendra Modi, Rahul Gandhi.
MK Stalin, PM Narendra Modi, Rahul Gandhi.Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Rahul Gandhi MK Stalin Meeting update : इंडिया आघाडीचे प्रमुख नेते चेन्नईत दाखल झाले असून काही वेळातच ते द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहे. या भेटीत ते स्टॅलिन यांचे परिसीमन विधेयकाला विरोध करण्यासाठी मनधरणी करणार आहेत. एकीकडे ही महत्वाची घडामोड घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

संसदेचे विशेष अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात सरकारकडून परिसीमन विधेयक मांडले जाणार आहे. महिला आरक्षणाशी संबंधित या विधेयकाला पाठिंब्यावर देशातील राजकारण तापले आहे. डीएमकेने या विधेयकाला पाठिंबा दिल्याने सरकारकडे दोन तृतियांश बहुमत असल्याचा दावा केला जात आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी सोशल मिडियात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

पंतप्रधान मोदींनी एनडीएच्या कटिबध्दतेवर बोलताना म्हटले आहे की, 'नारी शक्ती वंदन संशोधन होणे गरजेचे असून महिलांची स्पवन्न तसेच देशाच्या भविष्यसाठी सरकार हा संकल्प पूर्ण करण्यासाठी कटबिध्द आहे.' याआधी पंतप्रधानांनी शनिवारीही (२८ ऑगस्ट) विधेयकावरून व्हिडिओ पोस्ट केला होता.

MK Stalin, PM Narendra Modi, Rahul Gandhi.
Shiv Sena news : आता उद्धव ठाकरेंच्या बॉम्बचा प्रतिकार सहा खासदार कसा करणार? असीम सरोदे यांचे अपात्रतेबाबत सूचक विधान

'भारताची प्रगती, नारी शक्तीच्या स्वप्नांचे उड्डाण', असे पंतप्रधानांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबतच व्हिडिओमध्ये त्यांनी विरोधकांचाही समाचार घेतला आहे. त्यांनी म्हटले आहे की, नारी शक्तीला भागीदारी देण्याची लढाई अनेक दशकांपासून सुरू आहे. आम्हीही प्रयत्न करत असलेल्यांमध्ये आहोत. नारी शक्तीच्या सशक्तीकरणाचा भाजप-एनडीएचा दृढ संकल्प आहे.

MK Stalin, PM Narendra Modi, Rahul Gandhi.
Delimitation Controversy : मोठा ट्विस्ट; मोदी सरकारला पाठिंबा दिलेल्या 'TMC'च्या 20 बंडखोर खासदारांबाबत संभ्रम वाढला, बॅनर्जींचे बिर्लांना पत्र

आमच्यासाठी देशहित सर्वोपरी आहे. काही लोकांसाठी जेव्हा देशहितापेक्षा पक्षहित मोठे होते, तेव्हा त्याचे परिणाम नारी शक्ती आणि देशाला भोगावे लागतात, अशी टीका मोदींनी विरोधकांवर केली. देशातील अर्ध्या लोकसंख्येची स्वप्नं आणि देशाच्या भविष्यसाठी केलेला हा संकल्प पूर्ण करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.