Sharmistha Mukherjee Meet PM Modi : प्रणव मुखर्जींच्या कन्या शर्मिष्ठा यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, म्हणाल्या...

Sharmistha Mukharjee News : शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे.
Sharmistha Mukherjee Meet PM Modi
Sharmistha Mukherjee Meet PM ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ‘प्रणब माय फादर : ए डॉटर रिमेंबर्स’ या पुस्तकातून अनेक धक्कादायक राजकीय खुलासे केले आहेत. तसेच त्यांनी पुस्तकात राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जींना का स्थान मिळाले नाही, यावरही मोठा दावा केला आहे. त्यांनी याच पुस्तकात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांंच्याबाबतही अनेक दावे केले आहेत. याच शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी या सध्या सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांनी सोमवारी (ता.15) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवेळी शर्मिष्ठा मुखर्जींनी ‘प्रणब माय फादर : अ डॉटर रिमेम्बर्स’ हे पुस्तकही मोदींना भेट दिले.

Sharmistha Mukherjee Meet PM Modi
Shrikant Shinde : डोंबिवलीतील 'पै फ्रेंड्स लायब्ररी'च्या कार्यक्रमास यंदा खासदार शिंदेंचा 'विशेष' हातभार!

शर्मिष्ठा मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. माझ्या वडिलांशी असलेला त्यांचा आदर आजही कमी झालेला नाही या आशयाचं कॅप्शन लिहिलं आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत.

शर्मिष्ठा मुखर्जी (Sharmishtha Mukharjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला मुखर्जी यांनी वडिलांशी असलेला त्यांचा आदर आजही कमी झालेला नाही अशी कॅप्शन दिली आहे. या भेटीनंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुखर्जी काय म्हणाल्या...?

पंतप्रधान नरेंद्र मोदीं(Narendra Modi) ची भेट घेतल्यावर शर्मिष्ठा X वर एक पोस्ट केली आहे. या पोस्टची काँग्रेससह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, माझ्या पुस्तकाची एक प्रत मी मोदींना भेट दिली. पंतप्रधान मोदी कायमच माझ्याबाबत कनवाळू राहिले आहेत. आणि बाबांप्रती त्यांचा असलेला आदर किंचितही कमी झालेला नाही असेही शर्मिष्ठा मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

राहुल यांनी जो अध्यादेश फाडला होता, त्याचा...

शर्मिष्ठा यांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधी यांच्याविषयी लिहिले आहे. राहुल गांधी यांनी सप्टेंबर २०१३ रोजी पत्रकार परिषदेत एक अध्यादेश फाडला होता. त्याविरोधात आपले वडीलही होती. पण त्यांचे म्हणणे होते की, यावर संसदेत चर्चा व्हायला हवी होती. राहुल यांनी जो अध्यादेश फाडला होता, त्याचा उद्देश हा दोषी आमदार-खासदारांना तत्काळ अयोग्य ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला बाजूला सारणारा होता. तसेच अध्यादेशामध्ये उच्च न्यायालयात अपील प्रलंबित असेपर्यंत सदस्यत्व कायम राहू शकते, अशीही तरतूद होती. अध्यादेश फाडल्याचे मीच वडिलांना सांगितले होते. त्यावर ते खूप चिडले होते, असे शर्मिष्ठा यांनी म्हटले आहे.

Sharmistha Mukherjee Meet PM Modi
Babasaheb Deshmukh Vs ShahajiBapu Patil : 'ती' टीका जिव्हारी; शेकापच्या देशमुखांनी शहाजीबापूंचा सगळा इतिहासच काढला

'RSS'च्या कार्यक्रमात भाग घेण्यास केला होता विरोध

देशाचे राष्ट्रपती असताना आपले वडील व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक टीम म्हणून काम केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्य़क्रांत भाग घेण्यावरून आपण वडिलांना विरोध केला होता. तीन-चार दिवस आमच्यामध्ये वाद सुरू होता. एक दिवस ते म्हणले की, कोणत्याही गोष्टीला वैध ठरविणारा मी नाही, हा देश आहे. लोकशाहीमध्ये विरोधकांसोबत संवाद हवा, असे वडिलांना वाटत होते, अशा आठवणीही शर्मिष्ठा यांनी लिहिल्या आहेत.

Sharmistha Mukherjee Meet PM Modi
Milind Deora : लोकसभा की राज्यसभा; आता मिलिंद देवरांच्या उमेदवारीचा प्रश्न कायम...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com