Prateek Yadav postmortem report : प्रतीक यादव मृत्यू प्रकरण: शरीरावर जखमांच्या खुणा नाहीत; पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले?

Prateek Yadav postmortem report details : प्रतीक यादव मृत्यू प्रकरणात पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला असून शरीरावर कोणत्याही जखमेच्या खुणा नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं जाणून घ्या.
Prateek Yadav postmortem report : प्रतीक यादव मृत्यू प्रकरण: शरीरावर जखमांच्या खुणा नाहीत; पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले?
Published on
Updated on

समाजवादी पक्षाचे संस्थापक प्रमुख मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर पोस्टमार्टम अहवाल समोर आला असून, त्यामध्ये शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा आढळल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसल्याने डॉक्टरांनी पुढील तपासासाठी व्हिसेरा सुरक्षित ठेवला आहे. याशिवाय हृदयदेखील तपासणीसाठी जतन करण्यात आले आहे.

बुधवारी पहाटे प्रकृती बिघडल्याने प्रतीक यादव यांना लखनौतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, त्यांना आणले तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. पोस्टमार्टम प्रक्रियेदरम्यान शरीरावर मारहाण, संघर्ष किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या जखमांचे चिन्ह आढळले नाहीत. डॉक्टरांनी छातीचा एक्स-रेही केला. या तपासणीसाठी 3 डॉक्टरांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. संपूर्ण पोस्टमार्टमची व्हिडिओग्राफीही करण्यात आली, जेणेकरून पुढील चौकशीत सर्व माहिती उपलब्ध राहू शकेल.

Prateek Yadav postmortem report : प्रतीक यादव मृत्यू प्रकरण: शरीरावर जखमांच्या खुणा नाहीत; पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले?
Gold demand in India : सोने खरेदीत भारतीय जगात भारी! 'या' राज्यात होते सोन्याची सर्वाधिक विक्री? आकडा ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

प्रतीक यादव यांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या तपासण्यासाठी डॉक्टरांनी हार्ट सुरक्षित ठेवले आहे. प्राथमिक तपासात हृदयविकाराचा झटका ही शक्यता समोर आल्यास पुढील तपासात याचा उपयोग होणार आहे. तसेच व्हिसेरा तपासणीत शरीरात कोणतेही विषारी पदार्थ किंवा इतर कारण होते का, हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने विषबाधेची शक्यता व्यक्त केल्याच्या चर्चांना स्पष्ट नकार दिला आहे. रुग्णालयाचे संचालक यांनी सांगितले की, पहाटे सुमारे 5.30 वाजता प्रतीक यादव यांच्या चालकाने डॉक्टरांना तातडीने बोलावले होते. वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात आणण्यात आले आणि मृत घोषित करण्यात आले.

Prateek Yadav postmortem report : प्रतीक यादव मृत्यू प्रकरण: शरीरावर जखमांच्या खुणा नाहीत; पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, डॉक्टरांनी नेमकं काय सांगितले?
Aimim News : निदा खानला आश्रय देणे अंगलट, एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अनधिकृत घरावर भल्या पहाटे महापालिकेचा बुलडोझर!

कुटुंबीयांनी सुरुवातीला मृतदेह घरी नेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र नंतर त्यांनी स्वतः पोस्टमार्टम करण्यास संमती दिली. त्यानंतर पोलिसांना माहिती देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

प्रतीक यादव यांना यापूर्वी यकृत आणि फुफ्फुसांशी संबंधित त्रास होता. त्यांच्यावर अनेकदा उपचारही झाले होते. पोलिसांनी सध्या त्यांचा मोबाइल किंवा लॅपटॉप ताब्यात घेतलेला नाही. आता व्हिसेरा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com