

Mallikarjun Kharge Statement: दिवाळीला 'आनंदाची ईद' असं संबोधणाऱ्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या विधानावरुन सध्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपनं काँग्रेसवर मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप केला आहे. तर दुसरीकडं काँग्रेसचा एक नेत्यानं खर्गेंच्या बचावासाठी या वादात उडी घेतली आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते रशिद अल्वी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, खर्गेंच्या या विधानातून त्यांची सेक्युलर विचारसरणी प्रतित होते.
रशीद अल्वी म्हणाले, ईदचा नेहमी एका अशा उदाहरणादाखल वापर केला जातो की, जिथं आनंदाची गोष्ट असते. आपण असं म्हणत नाही का, की तू तर ईदचा चंद्र झाला आहेस. याचा अर्थ समोरच्यानं आनंद व्यक्त केला आहे.
रशीद अल्वी पुढे म्हणाले, ईदचा अर्थ आनंद आहे. जर खर्गेंनी असं विधान केलं असेल तर अशी भावना केवळ सेक्युलर व्यक्तीच व्यक्त करु शकतो. त्यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हटलं की, आम्ही भाजप किंवा जातीयवादी विचारसरणीच्या लोकांकडून अशा भावनांची अपेक्षा ठेवत नाही. याशिवाय ईद आणि दिवाळीमध्ये एक फरक आहे. हे दोन्ही आनंदाचे सण आहेत, पण ईदमुळं AQI (एअर क्वालिटी इंडेक्स) वाढत नाही.
रशीद अल्वी यांनी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दिल्ली-एनसीआरमध्ये वाढलेल्या AQI वरुन भाजपवर तिखट शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटलं की, भाजपनं वोटबँकेच्या राजकारणासाठी दिल्लीकरांना गॅसचेंबरमध्ये ढकललं आहे. यासाठी दिवाळीत वाजवले गेलेले फटाकेच जबाबदार आहेत. भाजपनं आपली राजकीय ताकद आणि मतांच्या भुकेसाठी फटाके उडवण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी दिला. त्यामुळं जितके फटाके उडवायचे होते तितके लोकांनी या दोन दिवसांतच फोडून टाकले.
अल्वी पुढे म्हणतात, राजधानी दिल्लीची हवा आता इतकी खराब झाली आहे की, दिल्लीच्या बाहेरचा पाऊल ठेवणारा व्यक्ती आजारी पडून जाईल. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या टाईम स्लॉटवर त्यांनी म्हटलं की, वेळेचं बंधन घालणं खरंतर योग्य आहे, जरी लोक याचं पालन करत नसले तरी. मी सुप्रीम कोर्टाचा सन्मान करतो. मी सुप्रीम कोर्टाचा सन्मान करतो पण जो कोणी फटाके फोडण्याची परवानगी देईल, मी त्यांना शत्रू मानतो.
आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळं चर्चेत असलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल केलेल्या विधानामुळं ते पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटलं की, मी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, हा मोठा सण आहे. जो भारतात सर्वच लोक साजरा करतात, याचं एकच कारण आहे ते म्हणजे हा सण आनंदाची ईद आहे. मोठ्या काळासाठी चालणारी ईद आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.