

Jayant Patil: गोकुळवर चार संचालक नेमून चेअरमनपदाची निवडणूक घेण्यासाठी सरकारनं अध्यादेश काढला आहे. यामुळं ही निवडणूक एकतर्फी होऊन बहुमत असतानाही चेअरमनपद पराभूत गटाकडं जाईल, अशी भीती असल्यानं आज सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात विराट मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जयंत पाटील यांनी हजेरी लावली. सरकारवर टीका करतानाच ही टेस्टट्युब बेबी मागे घ्या अशा शब्दांत त्यांनी फडणवीस सरकारला विनंती केली आहे.
जयंत पाटील म्हणाले, लोकशाहीचा आदर करुन भारतात लोकशाही चालत होती. त्याच तत्वावर या देशातल्या सहकारी संस्था चालत होत्या आणि तज्ज्ञ स्विकृताला सल्ला देण्याचा अधिकार मर्यादित करण्यात आला होता. तज्ज्ञ स्विकृत एक-दोन यापेक्षा जास्त नसावेत कारण हॉलमध्ये बसायला गर्दी होऊ नये म्हणून यापेक्षा जास्त नसावेत हा आपला शिरस्ता आहे. पण पहिल्यांदाच बहुमत मोडून काढायला चार तज्ज्ञ लागायला लागले आणि या चौघांनाही मतांचा अधिकार देण्याचं पाप या सरकारला करायला लागलं.
आजपर्यंत अनेक गोष्टी लोकशाहीची सर्व मुल्ये धाब्यावर बसवून या सरकारच्या काळात झालेली आहेत. या देशातील सर्व व्यवस्था ताब्यात घेऊन सत्तारुढ लोक बसले आहेत. न्यायालयाचाही निकाल आम्ही लावू शकतो अशा वल्गना करणाऱ्यांची पलिकडच्या बाजुला गर्दी आहे. या देशात आमच्या बाजुला मशालीचे चिन्ह घेऊन बसलेले आमचे सहकारी आहेत. त्यांचे मागच्या आमदराकीचे लोक घरी गेले नवीन आले तरी वेळ नाही. कारण सुप्रीम कोर्टाला वेळ नाही. पण सत्ताधारी लोकांच्या कोणाला काटा जरी रुतला तरी कोर्ट लगेच निर्णय घेतो.
आज या देशात काय चाललंय हे उघड्या डोळ्यानं देशाची जनता बघत आहे. इथं बरेच वकील खाली माना घालून बसलेले आहेत, त्यांनाही आपण ज्या व्यवस्थेचे भाग आहोत त्याबद्दल आत्मविश्वास कमी झालेला आहे. त्यामुळं या देशात न्याय नसेलच तर अशी लोकं रस्त्यावर यायला सुरुवात होईल याची सत्ताधाऱ्यांनी नोंद घ्यावी. अन्याय किती करावा याला मर्यादा असायला हवी, मी समजू शकतो की पक्षासाठी इकडं-तिकडं केलं. पण लोकांच्या डोळ्यात खुपेल एवढं कधी राज्यकर्त्यांनी करायचं नसतं.
आम्ही आजही संशयाचा फायदा फडणवीसांना देतो की त्यांची इच्छा नाही. पण ज्या मंत्रिमंडळाने अध्यादेश काढला त्याचे तुम्ही प्रमुख आहात. जर तुम्हाला लोकशाहीची बूज राखायची असती तर तुमच्या सहकाऱ्यांनी केलेला आग्रहाला ते बळी पडले नसते. आज दुर्देवानं अशा कायदा करण्यात आल आहे, ५०० कोटींच्यावर ज्यांचा टर्नओव्हर आहे त्या सगळ्यांच्या बोकांडी आचा चार सदस्य येणार आहेत. त्यामुळं कोणी असं समजू नये की हा केवळ गोकूळपुरताच निर्णय आहे. तर हा महाराष्ट्रातील लोकशाही मानणाऱ्या आणि सहकारी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक मतदाराच्या संदर्भातील हा निकाल आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचं कौतुक करावं तेवढं थोड आहे कारण एकटे बंटी पाटील लढत होते त्यांच्या बाजूनं या जिल्ह्यानं कौल दिला. सगळे एकाबाजूला आणि बंटी पाटलांसारखा वाघ एका बाजुला. लढणाऱ्याच्या बाजुला कोल्हापूर जिल्हा कायम उभा राहिला आहे हे आज तुम्ही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. मतपत्रिकेवर मतदान झालं तर माणूस कसा निवडून येऊ शकतो हे बंटी पाटलांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं.
टेस्ट ट्युब बेबी मागे घ्या...
कोर्टाचा निर्णय होता की २५ जणांनी निवडणूक या तारखेला घ्या, म्हणजे कोर्टानं सांगितलं की २५ जणांवर निर्णय घ्या, संख्या जमत नाही म्हणून या सबबीखाली निवडणूक थांबवता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वांना हजर रहावं लागेल. १३-१२ चा निकाल घ्या, चार जणं नेमायची असेल तर नेमा पण त्यांना मतांचा अधिकार देऊ नका. सरकारला कळकळीची विनंती आहे की आपण लोकशाहीत राहतो अशी रेटारेटी केली की त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतील. टेस्टट्युब बेबीचा कधी वापर होतो, जेव्हा होत नसेल तर टेस्टट्युब बेबी, माझं सरकारला विनंती आहे की ही टेस्टट्युब बेबी मागे घ्या. बंटी पाटलांच्या नेतृत्वाखाली जो गोकूळचा विकास होईल तो सरकारनं स्विकारला पाहिजे, लोकशाहीची हीच पद्धत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.