AAP Leader Shot Dead : पंजाब हादरलं! गुरुद्वाराबाहेरच आम आदमी पक्षाच्या नेत्याची गोळ्या घालून हत्या

AAP Leader Lucky Oberoi Shot Dead in Jalandhar: गुरुद्वाराबाहेर सकाळच्या प्रार्थनेसाठी येत असताना आप नेते लकी ओबेरॉय यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी अचानक गोळीबार केला. काही क्षणांतच ओबेरॉय जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
AAP leader Lucky Oberoi shot dead outside Model Town Gurdwara in Jalandhar
AAP leader Lucky Oberoi shot dead outside Model Town Gurdwara in JalandharSarkarnama
Published on
Updated on

Who was Lucky Oberoi, the AAP leader killed in Jalandhar: पंजाबमधील जालंधर येथे आम आदमी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय यांची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पहाटेच्या सुमारास मॉडेल टाऊनमधील एका गुरुद्वाराबाहेर हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात लकी ओबेरॉय यांना पाच गोळ्या लागल्या. त्यानंतर त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुद्वाराबाहेर सकाळच्या प्रार्थनेसाठी येत असताना आप नेते लकी ओबेरॉय यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी अचानक गोळीबार केला. काही क्षणांतच ओबेरॉय जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

AAP leader Lucky Oberoi shot dead outside Model Town Gurdwara in Jalandhar
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर प्रवास करणार असाल तर सावधान! सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी

दरम्यान, याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ओबेरॉय आपल्या एसयूव्हीमध्ये बसलेले दिसत आहेत. जेव्हा ते गुरुद्वाराबाहेर आपली कार पार्क करण्याचा प्रयत्न करत होते.

AAP leader Lucky Oberoi shot dead outside Model Town Gurdwara in Jalandhar
Maharashtra Politics 2026: महाविकास आघाडी संकटात, खासदारकीच्या तीन जागा गमावणार; राज्याचे राजकारण बदलणार?

तेव्हा त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं व्हिडिओत दिसत आहे. तर या हल्ल्यामुळे पंजाममध्ये एकच खळबळ उडाली असून पोलिसांकडून हल्लेखोरांचा तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com