BJP Office : राजकारण तापले! भाजप कार्यालयावर मध्यरात्री पेट्रोल बॉम्बने हल्ला; शहरात नाकेबंदी, आरोपींचा शोध सुरू

Petrol Bomb Allegedly Hurled At BJP Office In Punjab Sangrur : चार एक महिन्यांच्या आधी तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर एका व्यक्तीने रात्रीच्या सुमारास पेट्रोल बॉम्बने हल्ला केला होता.
BJP
BJP Sarkarnama
Published on
Updated on

Punjab Sangrur News : देशभरात पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून सुरू असलेल्या गदारोळात भाजपविरोधी लाट उसळली आहे. कॉकरोच जनता पार्टी, विद्यार्थी आणि विरोधकांनी केलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे. ज्यामुळे भाजप बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू असतानाच पंजाब राज्यातील संगरूर जिल्ह्यात भाजपच्या कार्यालयावर मोठा हल्ला झाल्याचे समोर आले आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, अज्ञात हल्लेखोरांनी उप्पली रोडवरील भाजपच्या जिल्हा कार्यालयावर पेट्रोल बॉम्ब फेकून हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी शहरात नाकेबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

चार एक महिन्यांपूर्वी तामिळनाडूमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर एका व्यक्तीने रात्रीच्या सुमारास हल्ला केला होता. हा हल्ला मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास करण्यात आला होता. या पेट्रोल बॉम्ब हल्ल्यात भाजप कार्यालयाचे मोठे नुकसान झाले नाही. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर व्यक्तीने घटनास्थळावरून पळ काढला होता.

BJP
BJP Gen-Z Strategy : धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यातून धडा! 'जेन-झी'साठी भाजपचा प्लॅन तयार, 2029 ची तयारी सुरू…

ही घटना ताजी असतानाच पंजाबमध्ये भाजपच्या कार्यालयावर पेट्रोल बॉम्बने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संगरूर जिल्ह्यातील भाजपच्या मुख्य कार्यालयावर अचानक झालेल्या या हल्ल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. तसेच, याचवेळी कार्यालयाच्या भिंतींवर काळा रंगही फवारण्यात आला आहे. या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, कार्यालयाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाचा तपास पंजाब पोलीस करत असून राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोराने बिअरच्या बाटलीला पेट्रोल बॉम्ब बनवले. यासाठी त्याने बिअरच्या बाटलीत पेट्रोल भरून ती भाजप कार्यालयाच्या बाहेरील भिंतीवर फेकली. बाटली भिंतीवर आदळल्यानंतर जोरदार स्फोट झाला आणि त्यामुळे आग लागली. ही घटना रविवारी रात्री सुमारे ३ वाजता घडली.

सोमवारी सकाळी कर्मचारी कार्यालय उघडण्यासाठी आले असता ही घटना उघडकीस आली. ज्यानंतर कर्मचाऱ्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. तसेच, शहरात नाकेबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

यावेळी संगरूरचे पोलीस अधीक्षक दविंदर अत्री यांनी सांगितले की, त्यांनी डीएसपी आणि संगरूर पोलीस ठाण्याच्या प्रभारींसोबत भाजप कार्यालयाला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. अत्री यांच्या म्हणण्यानुसार, बिअरच्या बाटलीत पेट्रोल भरून पेट्रोल बॉम्ब बनवण्यात आला होता. आम्ही तपास करत असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला जात असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. दोषींना लवकरच अटक केली जाईल, असेही अत्री यांनी म्हटले आहे.

BJP
BJP Politics : चक्क CM फडणवीसांच्या जवळच्या आमदाराला भाजप कार्यकर्त्याकडूनच धमकी; राजकारण पेटल्यानंतर माजी आमदाराकडून दिलगिरी व्यक्त

याच्याआधीही असेच हल्ले झाले असून गेल्या जूनमध्ये, दोन अज्ञात व्यक्तींनी बठिंडा येथील एका भाजप नेत्याच्या क्लिनिकवर पेट्रोल बॉम्ब फेकला होता. या वर्षाच्या सुरुवातीला, चंदीगडमधील पंजाब भाजपच्या मुख्यालयावरही एक देशी बॉम्ब फेकला गेला होता. अनेक तपास यंत्रणांनी एकत्रितपणे या घटनेचा तपास करत पाच संशयितांना अटक केली होती. पंजाब पोलिसांच्या मते, या संशयितांचे संबंध परदेशात असलेल्या सूत्रधारांशी होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com