Raghav Chadha news : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राघव चड्ढा यांचा विरोधकांवर पहिला विजय; हायकोर्टाने मान्य केली विनंती...

Raghav Chadha defamation case, personality rights India : सोशल मीडियातील हा मजूकर राजकीय टीका आणि बदनामी यामधील मर्यादा ओलांडत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले.
Raghav Chadha parliament speech
Raghav Chadha parliament speechSarkarnama
Published on
Updated on

Delhi High Court news : राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाच्या अन्य सहा खासदारांसह काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर त्यांच्यावर आपच्या नेत्यांसह सोशल मीडियातूनही बरीच टीका झाली. राघव चड्ढा यांनी पैशांसाठी स्वत:ला विकले, अशी जिव्हारी लागणारी टीका त्यांच्यावर झाली होती.

खासदार चड्ढा यांनी सोशल मीडियात होणाऱ्या या टीकेविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने “राघव चड्ढा यांनी पैशासाठी स्वतःला विकले” असा बदनामीकारक मजकूर असलेल्या सोशल मीडियातील पोस्ट हटविण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी चड्ढा यांनी याचिकेतून केलेली मागणी ग्राह्य धरत हा आदेश दिला आहे. मात्र, कोर्टाने व्यक्तिमत्व अधिकार संरक्षित करण्यापासून अंतरिम आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला.

आपली ऑनलाइन बदनामी आणि AI द्वारे फेरफार केलेले फोटो, व्हिडीओ विरोधात तातडीचे संरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका चड्ढा यांनी दाखल केली होती. कोर्टानेही या पोस्ट बदनामीकारक असल्याचे निरीक्षण नोंदवत चड्ढा यांच्या प्रतिष्ठेला तडा जात असल्याचे म्हटले आहे.

Raghav Chadha parliament speech
IAS officer controversy : उपजिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला, थेट भाजप नेत्यासोबत धक्काबुक्की; IAS अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली

राघव चड्ढा यांचा दावा

चड्ढा यांनी याचिकेमध्ये दावा केला होता की, काही सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी पैशासाठी निष्ठा बदलली, असा खोटा प्रचार करण्यात आला. प्रकार केवळ राजकीय टीका नसून त्यांच्या चारित्र्यावर हेतुपुरस्सर केलेला हल्ला असल्याचे चड्ढा यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. कोर्टानेही ते मान्य केले.

Raghav Chadha parliament speech
Tamil Nadu political news : आमदारांचे धडाधड राजीनामे अन् सर्वच मित्रपक्ष सत्तेत; मातब्बर विरोधकांना जोरदार झटके...

सोशल मीडियातील हा मजूकर राजकीय टीका आणि बदनामी यामधील मर्यादा ओलांडत असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. मात्र, कोर्टाने सुनावणीदरम्यान व्यक्तिमत्व हक्क हा मुद्दा विचाराधीन नसल्याचे सांगत याबाबत अंतिम आदेशात खुलासा केला जाईल, असे सांगितले. भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर चड्ढा यांना हा पहिला सोशल मीडियात ट्रोल झाल्यानंतर पहिला दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com