

Raghav Chadha controversy : भाजपचे राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा यांचे पंजाबमधील SIR प्रक्रियेअंतर्गत मतदारयादीतून नाव हटविण्यात आले. त्यामुळे पंजाब आणि दिल्लीतील राजकारण तापले आहे. चड्ढा यांनी पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारवर राजकीय षडयंत्राचा आरोप केला आहे. तर आप नेत्यांनीही त्यांच्यावर पलटवार करताना गंभीर आरोप केला आहे. तसेच त्यांची खासदारकी धोक्यात असल्याचाही दावा केला आहे.
राघव चड्ढा यांनी आपले नाव एसआयआर प्रक्रियेत वगळण्यात आल्याचा दावा सोशल मीडियातील पोस्टमध्ये केला आहे. त्यांना आप सरकारला याप्रकरणी जबाबदार धरले आहे. मी राज्यसभेचा खासदार आहे. माझे नाव पंजाबमधील मोहाली येथील मतदारसंघात असतानाही ते प्रारुप मतदारयादीत शिफ्टेड असे दाखविण्यात आल्याचा दावा चड्ढा यांनी केला आहे.
चड्ढा यांच्या आरोपांना आपनेही प्रत्युत्तर दिले आहे. आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी सोशल मीडियात पोस्ट करत राघव चड्ढा यांचे राज्यसभेचे सदस्यत्व धोक्यात येऊ शकते, असा दावा केला आहे. SIR प्रक्रियेत त्यांचे नाव मतदार यादीतून हटवण्यात आल्याचे कारण भारद्वाज यांनी दिले आहे. तर 'आप'नेही केलेल्या पोस्टमध्ये चड्ढा यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.
'आप'ने म्हटले आहे की, दिल्लीमध्ये मागील तारखेपासून मतदार नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न चड्ढा यांनी केल्याचा आरोप एका इंग्रजी दैनिकाने केला आहे. SIR प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून राबवली जाते. मतदारयादीतून नाव वगळणे किंवा टाकण्यामध्ये पंजाब सरकारची कुठलीही भूमिका नाही. चड्ढा हे पंजाबमध्ये नव्हे, तर दिल्लीमध्ये वास्तव्यास असल्याचे सार्वजनिक नोंदींवरून स्पष्ट होते, असा दावाही पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
चड्ढा हे दिल्लीतील राजिंदर नगर मतदारसंघात आपली मतदार नोंदणी मागील तारखेपासून करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. असा प्रकार घडला असेल तर त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी आपने केली आहे. भाजप किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने अशा बॅकडेट नोंदणीला मदत केली असल्यास, ते जनतेसमोर आणू, असा इशाराही आपने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.