New Delhi News: संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधकांच्या 'इंडिया'आघाडीच्या 10 खासदारांच्या शिष्टमंडळानं शुक्रवारी(ता.9 ऑक्टोबर) रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.यावेळी इंडिया आघाडीच्या शिष्टमंडळानं देशातील मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह एसआयआर प्रक्रियेबाबत एक निवेदन राष्ट्रपतींना दिलं.
विरोधकांच्या इंडिया आघाडीतील काँग्रेससह विविध पक्षांचे खासदार दिल्लीत सलग तीन दिवस आंदोलन करत होते. या आंदोलनानंतर विरोधकांनी शुक्रवारी पुढचं पाऊल टाकतानाच शिष्टमंडळासह राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांची भेट घेऊन निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, "देशात मतांची चोरी होत आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे आणि आम्ही राष्ट्रपतींना या मतचोरीबद्दल सांगितले असता त्यांनीही ते नाकारलं नाही. मात्र, त्यांनी आम्हांला याबाबतचे पुरावे देण्यास सांगितले असल्याचंही गांधी यांनी म्हटलं. आम्ही त्यांना पुरावे देणार आहोत,यासाठी त्यांनी आम्हांला वेळही दिला आहे. याचबरोबर आम्ही उद्या सरन्यायाधीशांनाही निवेदन देणार आहोत अशी माहितीही त्यांनी दिली.
'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी मतदार यादीतील त्रुटी आणि निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षतेबाबत राष्ट्रपतींसमोर शंका उपस्थित केली. तसेच देशातील विद्यार्थ्यांना माहिती आहे की, मतचोरी झाली असून पंतप्रधान हे मतचोरीचे आर्किटेक्ट आहेत, शाह आणि ज्ञानेश कुमार हे इम्प्लिमेंट करणारे आहेत, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. ज्ञानेश कुमार ,पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शाह हे लोकशाही संपवत असल्याचंही आम्ही त्यांना सांगितलं. त्यांनीही आमचं म्हणणं ऐकून घेतल्याचं ही गांधी यांनी सांगितलं.
गेल्या चार दिवसांपासून दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलन करीत केंद्र सरकारची कोंडी केली आहे. गेल्या तीन दिवसांपासून काँग्रेससह इंडिया आघाडी आक्रमक झाली आहे. राहुल गांधी, काँग्रेसने निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन तापले आहे. हे आंदोलन किती दिवस चालेल याची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.