Amit Shah: राहुल गांधींनी मध्येच थांबवलं... आपल्या पत्रकार परिषदांवर बोलण्याचं दिलं आव्हान! शहा भडकले म्हणाले,"...संसद चालणार नाही"

Amit Shah answer to Rahul Gandhi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात सध्या 'निवडणूक सुधारणा' या विषयावर चर्चा सुरु आहे. या चर्चेमध्ये विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi
Published on
Updated on

Amit Shah answer to Rahul Gandhi: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात सध्या 'निवडणूक सुधारणा' या विषयावर चर्चा सुरु आहे. या चर्चेमध्ये विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधींचे मतचोरीचे आरोप शहा यांनी फेटाळून लावताना निवडणूक आयोगानं सुरु केलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष पुनर्पडताळणी मोहिमेवर अर्थात एसआयआरवर देखील त्यांनी भाष्य केलं.

Rahul Gandhi
PM Modi Tours: PM मोदींनी बारा वर्षात केले 94 परदेश दौरे; 85 टक्के दौरे अधिवेशनाच्या काळातच! सविस्तर जाणून घ्या

शहा म्हणाले, अमित शहा हे निवडणुक आयोगावर होत असलेल्या आरोपांना सविस्तर उत्तर देत असताना म्हणाले की, एसआयआरवर या सभागृहात खरंतर चर्चा होऊ शकत नाही. कारण हा विषय निवडणूक आयोगाच्या अखताऱ्यातील आहे. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्यामुळं त्यांच्या कार्यक्षेत्रातील विषयांवर जर सभागृहात काही प्रश्न उपस्थित होत असतील तर त्याची उत्तरं कोण देणार? पण विरोधकांनी नंतर निवडणूक सुधारणा यावर चर्चेची मागणी केली त्यानुसार याच विषयावर आपण चर्चा ठेवली आहे.

Rahul Gandhi
Tehsildar: जमिनीच्या अनुकूल निकालाच्या बदल्यात 10 लाखांची मागणी! नायब तहसीलदारांचा झाला करेक्ट कार्यक्रम

दरम्यान, एसआयआरवर एकतर्फी चार महिन्यांपासून खोट पसरवलं आहे. याद्वारे देशातील जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी देशात १९५२ पासून आत्तापर्यंत जेवढ्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळी कुठल्या सरकारांनी एसआयआरची प्रक्रिया राबवली याची माहिती त्यांनी सभागृहात दिली. तसंच २००४ मध्ये देशात शेवटची मतदार यादी पुनर्पडताळणी मोहीम पार पडली त्यानंतर ती थेट यंदाच होत असल्याचं सांगितलं. त्यामुळं या काळात काँग्रेसचं सरकार असताना देखील याच मतदार याद्या अस्तित्वात होत्या असा दावाही त्यांनी केला.

Rahul Gandhi
Shaurya Patil death controversy : महाराष्ट्राच्या 'शौर्य'च्या न्यायासाठी खासदार लंके दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या दारी, 'कारवाई का नाही?' म्हणत विचारला थेट प्रश्न; पोलिस आयुक्तांनाही घाम फोडला

तसंच शहा बोलत असताना अचानक विरोधीपक्ष नेते राहुल गांधी हे उभे राहिले आणि आपला मुद्दा मांडू लागले. त्यामुळं काही काळ सभागृहात गदारोळ झाला. यावेळी राहुल गांधी अमित शहांना म्हणाले की, मी मतचोरीचे पुरावे देणाऱ्या ज्या तीन पत्रकार परिषदा घेतल्या त्यावर आपण आता चर्चा करायला पाहिजे. यावर चर्चेचं मी तुम्हाला आव्हान देतो.

Rahul Gandhi
Priyanka Chaturvedi News : ठाकरेंनी दिलेलं चॅलेंज, राऊतांच्या अनुपस्थितीत प्रियांका चुतर्वेदींनी लढविला किल्ला; उपसभापतींना ‘त्या’ मुद्दयावर करावा लागला खुलासा

त्यानंतर शहांनी गांधींना उत्तर देताना म्हटलं, मी गेल्या ३० वर्षांपासून विधानसभा आणि लोकसभेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत आहे. मला संसदीय प्रणालीचा मोठा अनुभव आहे. विरोधीपक्ष नेते म्हणतात की आधी तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मला ऐकायचं आहे. संसदेचं कामकाज तुमच्या इच्छेनुसार चालत नाही. मी कुठल्या क्रमानं भाषण करायचं हे मी ठरवेनं. तुम्हाला माझं भाषण ऐकण्यासाठी संयम ठेवावा लागेल. मी यांच्या एका एका प्रश्नाचं उत्तर देईन पण माझ्या भाषणाचा क्रम हे ठरवू शकत नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com