Rahul Gandhi Mallikarjun Kharge : शिंदेंसह काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना राहुल गांधी भित्रे म्हणाले; खर्गेंनी 'तुमचेच मित्र..' म्हणत घेतली फिरकी

Congress party, Congress defectors, Rahul Gandhi statement : ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद आदी नेत्यांना उद्देशून खर्गे यांनी हे विधान केले असावे. कारण हे नेते राहुल गांधी यांचे चांगले मित्रही होते.
Mallikarjun Kharge| Rahul Gandhi
Mallikarjun Kharge| Rahul Gandhi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress news : मागील काही वर्षांमध्ये काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बहुतेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आहे. या नेत्यांमध्ये पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या टीममधील ज्योतिरादित्य शिंदे, आर. पी. एन सिंह, जितीन प्रसाद यांचाही समावेश आहे. पक्षाच्या एका अनौपचारिक बैठकीत राहुल गांधींनी त्यांना भित्रे म्हटले. त्यावर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी त्यांचीच फिरकी घेतली.

काँग्रेस मुख्यालयात नुकताच चहापानाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला होता. यादरम्यान एका अनौपचारिक बैठकीत घडलेल्या प्रसंगाची माहिती आता समोर आली आहे. 'न्यूज १८'ने याबाबतचे वृ्त दिले आहे. इंदिरा भवनमध्ये झालेल्या या बैठकीत राहुल गांधींनी यूथ काँग्रेस, एनएसयूआय आणि सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना चहापानासाठी आमंत्रित केले होते. बैठकीला सुमारे ६० पदाधिकारी उपस्थित होते.

संवाद साधताना राहुल गांधींनी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांविषयी भूमिका मांडली. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या नेत्यांचा बब्बर शेर असला उल्लेख करत त्यांनी कौतुक केले. राहुल गांधी म्हणाले, पक्षात एकनिष्ठ राहिलेल्यांनी भाजप आणि आरएसएस विरोधात लढा सुरूच ठेवला. दबाव आणि कायदेशीर कारवाईची भीती असूनही हे कार्यकर्ते हटले नाहीत.

Mallikarjun Kharge| Rahul Gandhi
Rekha Arya News : धक्कादायक : भाजप सरकारमधील महिला कॅबिनेट मंत्र्यांचा पतीकडून छळ; जीवे मारण्याचे षडयंत्र, पहिले लग्न लपविले, अनैतिक संबंध...

काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांना भित्रे, लोभी म्हणत राहुल गांधींनी निशाणा साधला. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या खर्गेंनी पक्ष सोडून गेलेले राहुल गांधींचे मित्र होते, असे म्हटले. ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद आदी नेत्यांना उद्देशून खर्गे यांनी हे विधान केले असावे. कारण हे नेते राहुल गांधी यांचे चांगले मित्रही होते.

Mallikarjun Kharge| Rahul Gandhi
Supreme Court news : विधानसभेच्या मतमोजणीचे फुटेज हरवले! निवडणूक आयोगाचे उत्तर ऐकताच सुप्रीम कोर्टाने दिली तंबी, राजकारण तापले...

खर्गे यांच्या या विधानावर राहुल गांधी यांनीही लगेच 'त्यांना ओळखण्यात चूक झाली', असे उत्तर दिले. या मुद्द्याची आता काँग्रेसच्या वर्तुळात चर्चा होत आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी यावेळी कार्यकर्त्यांना राजकीय मैत्रीबाबत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित एक अनुभवही सांगितला. आपण एखाद्या व्यक्तीकडे मित्र म्हणून पाहत असलो तरी तो प्रत्यक्षात मित्र असेलच असे नाही. तर विरोधक नेहमीच शत्रू नसतो. पक्षांतर केलेल्या नेत्यांशी हा अनुभव जुळणारा असल्याचेही राहुल गांधी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com