Supreme Court news : सरन्यायाधीशांनी मार्ग दाखविला! आता थेट कायदेशीर लढा, याचिकेवर राहुल गांधींसह 11 नेत्यांच्या सह्या...

Rahul Gandhi Supreme Court, CEC Gyanesh Kumar : राहुल गांधी हे मुख्य याचिकाकर्ते असतील. तसेच मल्लिकार्जून खर्गे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, डी. राजा, सौगत राय, सुप्रिया सुळे, संजय राऊत, महुआ माझी, ई.टी .मोहम्मद बशीर, एम. ए. बेबी यांच्याही याचिकेवर सह्या आहेत.
Rahul Gandhi, CJI Surya Kant
Rahul Gandhi, CJI Surya KantSarkarnama
Published on: 
Updated on: 

Election Commission of India update : इंडिया आघाडीकडून सुप्रीम कोर्टाच्या दिशेने मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीच मार्ग दाखविल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

राहुल गांधी यांनी सरन्यायाधीशांकडे भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी भेटण्यास नकार दिला होता. याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना राहुल यांनी सरन्यायाधीशांनी याचिका दाखल करण्याचा मार्ग सांगितल्याचे नमूद केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाविरोधात सोमवारी याचिका दाखल करण्यात आली. ही याचिका राहुल गांधी विरूध्द निवडणूक आयोग अशी असणार आहे.

याचिकेमध्ये राहुल गांधी हे मुख्य याचिकाकर्ते असतील. तसेच मल्लिकार्जून खर्गे, अखिलेश यादव, तेजस्वी यादव, डी. राजा, सौगत राय, सुप्रिया सुळे, संजय राऊत, महुआ माझी, ई.टी .मोहम्मद बशीर, एम. ए. बेबी यांच्याही याचिकेवर सह्या आहेत. एसआयआर प्रक्रियेत घोळ केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. सर्व विरोधी पक्षांनी पहिल्यांदाच एकत्रितपणे निवडणूक आयोगाविरोधात ही याचिका दाखल केल्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

Rahul Gandhi, CJI Surya Kant
Rahul Gandhi news : राहुल गांधींचा पहिल्यांदाच सर्वात मोठा दावा; ज्ञानेश कुमारांचे आपल्याला मेसेज, मोदी सरकारमधील 200 अधिकारी...

दरम्यान, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी भेट नाकारतानाच राज्यघटनेतील अनुच्छेद ३२ उल्लेख करत म्हटले होते की, सुप्रीम कोर्टाला प्रशासकीय स्तरावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून उपस्थित करण्यात आलेल्या मुद्य्यांच्या आधारे कामकाज करता येत नाही. पण नागरिकांशी संबंधित प्रकरणांमध्ये न्यायाच्या बाजून विचार करणे हे कोर्टाचे घटनात्मक दायित्व आहे.

Rahul Gandhi, CJI Surya Kant
IPS पत्नीसाठी केडर बदलून महाराष्ट्रात, आता वर्षभरातच IPS अधिकाऱ्याचा तडकाफडकी राजीनामा

भेट न होणे, याचा अर्ज कोर्टाचे न्यायाचे दरवाजे बंद आहेत, असे नाही. विरोधी पक्षनेते कायदेशीर याचिका दाखल करत असतर तर त्यावर न्यायालयीन प्रक्रियेद्वारे विचार केला जाईल, असेही सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले होते. राहुल यांनी पत्रकार परिषदेत याच गोष्टीचा उल्लेख करत सरन्यायाधीशांनी आपल्याला मार्ग दाखविल्याचे म्हटले होते. त्यानुसारच विरोधी पक्षांनी याचिका दाखल केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com