

Maharashtra MLC Election 2026 : विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या 10 आमदारांच्या निवडीसाठी येत्या 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या 10 जागांसाठी प्रत्येकी 29 मतांचा कोटा असणार आहे. त्यामुळे पक्षीय संख्याबळ पाहता भाजपचे पाच, शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
भाजपचा पाचवा उमेदवार निवडणूक येण्याची मदार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडील आठ मतांवर मदार असणार आहे. ही आठ मतं कोणाची असणार, याची उत्सुकता असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यादृष्टीने मतांची रणनीती आखतील, असे सांगितलं जात आहे.
विधानसभेतील राजकीय पक्षांचे संख्याबळ पाहता 10 पैकी भाजपला (BJP) सहा, शिवसेनेला दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसला आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. त्यामुळे विधान परिषदेची निवडणूकसुद्धा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
विधानसभेत सध्या 286 आमदार आहेत. राहुरी आणि बारामती (Baramati) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सध्या होत आहे. यासाठी 23 एप्रिलला मतदान होऊन चार मे रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे राहुरी आणि बारामतीतील नवनिर्वाचित सदस्य निवडून आल्यानंतर तातडीने शपथ घेऊन 12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत हे नवनिर्वाचित आमदार मतदान करू शकतात.
भाजपकडे सध्या विधानसभेत अपक्षांसह 137 आमदारांचे संख्याबळ आहे. भाजपला पाचवी जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडील अतिरिक्त असलेल्या 12 पैकी आठ मते घ्यावी लागतील. शिवसेनेकडे 60 आमदारांचे संख्याबळ आहे, त्यामुळे त्यांचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादीकडे 41 आमदार असल्याने एक जागा निवडून आल्यानंतरही त्यांच्याकडे 12 मते शिल्लक राहतील. ही अतिरिक्त मते भाजपला मिळाल्यास त्यांचा पाचवा उमेदवार निवडून येऊ शकतो.
दुसरीकडे, महाविकास आघाडीकडे एकूण 46 आमदार आहेत. मात्र त्यांना कम्युनिस्ट पक्षाच्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत, तर AIMIM पक्षाचा एक आमदार आहे. समाजवादी पक्ष आणि AIMIM यांच्या चार मतांचा ‘मविआ’ला काहीच फायदा होऊ शकणार नाही. मात्र, ‘मविआ’चा एक उमेदवार सहज निवडून आल्यानंतरसुद्धा त्यांची मते शिल्लक राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.