Rahul Gandhi News : मेरा घर 12 तुघलक लेन... राहुल गांधींना खासदारकी अन् आता बंगलाही मिळाला

Rahul Gandhi bungalow News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसदेचे सदस्यत्व परत मिळाल्यानंतर त्यांना दिल्लीतील सरकारी बंगलाही परत मिळाला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

New Delhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना संसदेचे सदस्यत्व परत मिळाल्यानंतर दिल्लीतील सरकारी बंगलाही परत मिळाला आहे. कर्नाटमध्ये 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी 'मोदी आडनाव' बदनामी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. त्यानंतर राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्याचवेळी लोकसभेच्या गृहनिर्माण समितीने राहुल गांधींना त्यांचा जुना 12, तुघलक लेन बंगलाही परत दिला आहे.

सुरत कोर्टाने मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर राहुल गांधी यांना मार्चमध्ये खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आले होते. यानंतर प्रोटोकॉलनुसार राहुल गांधींनी (Rahul Gandhi) एप्रिलमध्ये दिल्लीतील त्यांचे अधिकृत निवासस्थान रिकामे केले होते. संसदेतून अपात्र ठरलेल्या खासदारांना सरकारी निवासस्थान मिळत नाही. त्यांना अधिकृत निवासस्थान रिकामे करण्यासाठी एक महिन्याचा अवधी मिळतो. लोकसभा गृहनिर्माण समितीने राहुल गांधींना त्यांचा अधिकृत बंगला रिकामा करण्यास सांगितले होते. राहुल गांधी 2005 पासून या बंगल्यात राहत आहेत.

Rahul Gandhi
Maharashtra Congress march : काँग्रेसची १६ ऑगस्टनंतर राज्यात पदयात्रा; या नेत्यांवर असणार महत्वपूर्ण जबाबदारी

बंगला रिकामा करताना राहुल गांधी म्हणाले होते, मला सत्य बोलण्याची शिक्षा दिली जात आहे. आता मला या घरात राहायचे नाही कारण भारतातील लोकांनी दिलेला बंगला त्यांच्याकडून 'हिसकावून' घेतला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवारी राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्याच वेळी, न्यायालयाने म्हटले होते की त्यांची टिप्पणी चांगली नसली तरी संसदेतून त्यांना अपात्र ठरवण्याचा परिणाम त्यांच्या मतदारांवर होईल.

Rahul Gandhi
Vijay Wadettiwar News : विजय वडेट्टीवारांची दिल्लीत नवी सेटिंग; विधानपरिषदेतील विरोधी खुर्चीही ओढणार?

राहुल गांधी यांना बंगला परत मिळाल्यानंतर त्यांनी एका वाक्यातच आपली भावना व्यक्त केली. 'माझे घर पूर्ण हिंदुस्थान आहे' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे लोकप्रतीनिधी कायद्यानुसार त्यांना आपली खासदारकी गमवावी लागली होती. गुजरात (Gujarat) उच्च न्यायालयाने ही सुरत कोर्टाचा निकाल कायम ठेवली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देत शिक्षेला स्थगिती दिली.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.