Rahul Gandhi PC: भाजप का जिंकतंय...; इंदिरा गांधींचा दाखला अन् राहुल यांनी थेट मोदी-शहांसह आयोगालाही अडचणीत आणलं

Rahul Gandhi Vs Gyanesh Kumar : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली असल्याचं म्हटलं. मात्र, आता त्यांच्याच कार्यकाळात प्रत्येक निवडणुकीत वोटचोरी झाल्याचा आरोप गांधींनी केला आहे. प्रस्थापितविरोधी लाट ही भारतीय राजकारणातील वस्तुस्थिती असल्याचंही ते म्हणाले.
Rahul Gandhi On Gyanesh Kumar .jpg
Rahul Gandhi On Gyanesh Kumar .jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपनं 2014,2019 आणि 2024 अशा सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकल्या आहेत.सध्या मोदी सरकारची तिसरी टर्म सुरू असून गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ भाजपप्रणित एनडीए सरकार केंद्रात सत्तेत आहे. हे तीनही निवडणुकांमधील विजयावर शंका उपस्थित करणारं खळबळजनक विधान लोकसभेचे विरोधी पक्षनेते संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी केली आहे.

राहुल गांधी आणि विरोधकांकडून गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर सातत्यानं गंभीर आरोप केले जात आहे. या सर्व आरोपांना मोठं पाठबळ हे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी केलेल्या दाव्यामुळे मिळालं.

निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या विधानांमुळे निवडणूक आयोगातील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले. याच संदर्भानं विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी गुरुवारी(ता.24)पत्रकार परिषद घेत काही धक्कादायक मुद्दे उपस्थित करत मोदी-शाहांसह आयोग,आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर एकापाठोपाठ एक गंभीर आरोप केले आहेत. आता विरोधकांनी मोदी सरकारनंतर आता ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात फासे टाकण्यास सुरुवात केली असून त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ज्ञानेश कुमार यांना वाचवत आहेत. आज देशात ज्या प्रकारचा लोकशाही,संविधान यांना धक्के देत अंदाधुंद कारभार सुरू आहे,तसा यापूर्वी कधीही झाला नव्हता. त्याचमुळे ज्ञानेश कुमार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. देशातील वोटचोरीद्वारे लोकांच्या मतदानाचा अधिकारावरच घाला दरोडा टाकण्यात येत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi On Gyanesh Kumar .jpg
Election Commissioner: राहुल गांधींनी वात पेटवली, विरोधक निवडणूक आयोगाला पहिला मोठा धक्का देणार, ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग आणणार

राहुल गांधी म्हणाले, हा थेट संविधानावर हल्ला आहे. हे लोक देशद्रोही आहेत.प्रत्येक कटामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सहभागी आहेत. आम्ही देशासोबत धोका होऊ देणार नाही. ज्ञानेश कुमार यांना स्वतंत्रपणे काम करु दिले जात नसून त्यांच्यावर दुसर्‍या कोणाचं तरी नियंत्रण असल्याचा हल्लाबोलही त्यांनी या पत्रकार परिषदेत केला.

भाजपच्या विजयाचे गमक आता समोर आले आहे. मतचोरीचे पुरावे समोर येत आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील निवडणुकांवर त्याचा परिणाम झाला. तसेच सत्ताविरोधी लाट ही भारतीय राजकारणातील वस्तुस्थिती आहे. मतचोरी हा प्रत्येक भारतीयाच्या अधिकाराचं हनन असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Rahul Gandhi On Gyanesh Kumar .jpg
Dharashiv News : 'त्यांनी एकदा जनतेतून निवडणूक लढवावी' : ओम राजेनिंबाळकरांचा पहिल्यांदा संयम सुटला; टीका करताना ठाकरेंच्या नेत्याची काढली लायकी

प्रस्थापितांविरोधातील लाटेचा फटका नक्की बसतो. इंदिरा गांधींनाही या लाटेचा फटका बसला होता. पण भाजपवर सत्ताविरोधी लाटेचा परिणाम का झाला नाही? भाजप सातत्याने निवडणुका कशा जिंकत आहे? असे एक ना अनेक प्रश्नांनी राहुल गांधींनी संशयकल्लोळ निर्माण केला आहे.

दोन निवडणूक आयुक्तांनी ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. २०२४ मध्येही मतचोरी झाली आहे. देशाला स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे कधीच लोकशाही आणि संविधानावर गदा आली नव्हती. असं देशाच्या इतिहासात हे भाजप- मोदी-शाह यांच्या काळात घडत आहे. लोकशाहीला व्यवस्थेच्या अधःपतनासाठी ज्ञानेश कुमार हेच जबाबदार असल्याचा सनसनाटी आरोपही गांधी यांनी यावेळी केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी केली असल्याचं म्हटलं. मात्र, आता त्यांच्याच कार्यकाळात प्रत्येक निवडणुकीत वोटचोरी झाल्याचा आरोप गांधींनी केला आहे. प्रस्थापितविरोधी लाट ही भारतीय राजकारणातील वस्तुस्थिती असल्याचंही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com