

New Delhi News: गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.तसेच लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे सर्वोच्च नेते राहुल गांधी यांनीही थेट निवडणूक आयुक्तांविरोधात दंड थोपटले असून त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोपही केला आहे.त्याचदरम्यान, आता विरोधी पक्षांनी एकत्र येत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांत महाभियोग आणण्याची तयारी सुरू केली आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी दाखवलेल्या एकीमुळे 12 वर्षांच्या सत्तेच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मोदी सरकारला अनेकदा बॅकफूटला जावे लागले होते. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेही राहुल गांधी व विरोधकांच्या झंझावातामुळे पंधरा दिवस सभागृहात उपस्थित राहिले नव्हते. तर आता निवडणूक आयुक्तांवर होत असलेल्या गंभीर आरोपांनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
आता काँग्रेस आणि विरोधकांच्या 'इंडिया'आघाडीतील घटक पक्षांनी मुख्य केद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग आणण्याच्या प्रस्तावावर एकमत झाल्याची माहिती समोर येत आहे. पुढील दोन आठवड्यांत हा महाभियोगाचा प्रस्ताव दोन्ही सभागृहात सादर होण्याची दाट शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अनेक निर्णयांवर तब्बल 14 वेळा आक्षेप नोंदवला,मात्र,त्याकडे दुर्लक्ष करत ते निर्णय घेण्यात आल्याचा खळबळजनक दावा केंद्रीय निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी केला होता. त्यानंतर विरोधकांना सत्ताधारी मोदी सरकारसह आयोगाला घेरण्याची आयती संधी मिळाली.
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांबाबत भाष्य करताना थेट निवडणूक आयोगावरच जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांनी मतदान प्रक्रियेतील अनियमितता आणि मतदार यादीतील बदलांच्या मुद्द्यावरून भाजप, RSS आणि निवडणूक आयोगाला चांगलेच धारेवर धरले आहे.
राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत ‘वोट चोरी’ हा भारतीय जनतेविरोधातील अपराध असून, तो संविधानावर थेट हल्ला असल्याचा दावा केला. तसेच भाजप, RSS आणि निवडणूक आयोगाने मिळून हे केल्याचा आरोप करत गांधी यांनी त्याला थेट ‘देशद्रोह’च संबोधले आहे.
राहुल गांधी पोस्टमध्ये म्हणतात, “मतदान चोरी हा भारतीय जनतेविरोधातील अपराध आहे आणि आपल्या संविधानावर थेट हल्ला आहे. भाजप, RSS आणि निवडणूक आयोगाने हे घडवून आणले असून, त्यांनी देशद्रोह केला आहे. न्याय होईल असा विश्वासही त्यांनी आपल्या पोस्टमधून व्यक्त केला आहे.
या पोस्टसोबत राहुल गांधी यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी निवडणूक आयोग आणि अधिकाऱ्यांना इशारा देताना, तुम्ही जे करत आहात, ते चुकीचं आहे. हा देशद्रोह आहे. वेळ येईल, आम्ही तुम्हाला पकडू. तुम्हांला सोडणार नाही, असंही राहुल गांधी यांनी पोस्टमधून इशारा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.