

New Delhi News : कर्नाटकात मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलल्यानंतर काँग्रेस आता खऱ्या अर्थानं अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलं होतं.संसदेचे विरोधी पक्षनेते व खासदार राहुल गांधी यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत काँग्रेससाठी 'मास्टरप्लॅन' तयार केला आहे. काँग्रेसनं आता थेट महाराष्ट्रासह थेट सात राज्यांचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू केल्याची माहिती आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजपनं दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि त्रिपुरा या चार राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलून नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यानंतर आता काँग्रेसमध्येही फेरबदलाचं वारं वाहू लागलं चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रासह सात राज्यांतील प्रभारींसोबतच प्रदेशाध्यक्षही बदलले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसकडून दिल्ली,राजस्थान,मध्य प्रदेश,केरळ,तामिळनाडू, कर्नाटकसह महाराष्ट्रात देखील हे संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेतृत्वाकडून आगामी काळात होत असलेल्या उत्तर प्रदेश,कर्नाटक,राजस्थान,मध्य प्रदेश यांसारख्या मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे बदल केले जाणार असल्याची चर्चा आहे.
भाजपप्रमाणेच आता काँग्रेसनेही आपली निवडणुका रणनीती अवलंबण्यास सुरूवात केल्याचं बोललं जात आहे. ज्याप्रकारे भाजप प्रत्येक निवडणुकांसाठी मायक्रो प्लॅनिंगसह उतरते,तसेच काँग्रेसनेही आपला नवा निवडणूक पॅटर्न सेट केल्याचं चर्चा आहे.
काँग्रेस नेतृत्वाकडून केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, छत्तीसगड राजस्थान या राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता आहे. तर आसाम, तामिळनाडू, महाराष्ट्र या राज्यांतील प्रभारी बदलले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
काँग्रेसच्या हायकमांडच्या टीममधील अत्यंत विश्वासू नेते म्हणून रमेश चेन्निथला यांनी नुकत्याच पार पडलेल्या केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशात त्यांचाही मोठा वाटा राहिला. त्याचमुळे काँग्रेसकडून जी काही तीन प्रमुख नावं मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे होती, त्यात चेन्निथला यांच्याही नावाचा समावेश होता. मुख्यमंत्री पदासाठी त्यांचं पारडं जड होतं. पण ऐनवेळी त्यांचा पत्ता कट झाला आणि व्ही. डी. सतीशन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ येऊन पडली.
काँग्रेसनं केरळमध्ये धक्कातंत्र वापरत अचानकपणे व्ही.डी.सतीशन यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणलं. यामुळे साहजिकच रमेश चेन्निथला यांची नाराजी पुढे आली होती. पण आता सतीशन यांच्या नेतृत्वातील केरळ सरकारच्या मंत्रिमंडळात चेन्निथला यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
रमेश चेन्निथला यांच्याकडे महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारी पदाचा 'चार्ज' आहे. त्यांनी 2024 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यावेळी महाविकास आघाडीत काँग्रेसची बाजू चांगलीच लावून धरली होती. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांना हाताशी धरून त्यांनी राज्यात अडचणीत सापडलेल्या काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी वेळोवेळी कठोर पावले उचलण्यातही कोणतीही कसूर सोडली नसल्याचं दिसून आलं होतं.
काँग्रेसच्या अनुभवी नेत्यांमध्ये रमेश चेन्निथला यांचा समावेश होतो. याचमुळे काँग्रेसच्या नेतृत्वानं महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवली होती. पण आता केरळ सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेस हायकमांड महाराष्ट्रात काँग्रेसला नवे प्रभारी देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.