Rahul Gandhi News : राहुल गांधींची दुपारी एक वाजता पत्रकार परिषद; काँग्रेसचं राजीनामा सत्र सुरू होणार? देशाचे लागले लक्ष!

Rahul Gandhi's Disqualification As MP : राहुल गांधींच्या वायनाडमध्ये पोटनिवडणूक लागणार का?
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarakrnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसंचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्याप्रकरणी गुजरातमधील सुरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर काल (दि. २४ मार्च) त्यांची संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं. काँग्रेस पक्षासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. लोकसभा सचिवालयाच्या या निर्णयाविरोध तीव्र संताप व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज दुपारी एक वाजता गांधी सभा घेणार आहेत. आज ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.

Rahul Gandhi
Sharad Pawar On Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, 'सर्वांनी एकत्र येवून...'

राहुल गांधींवर कारवाई करण्यात आल्यानंतर काँग्रेस स्टेअरिंग कमिटीची एक बैठक झाली. यामध्ये काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीत एका खासदाराने अशी सूचना केली की, राहुल गांधींच्या समर्थनार्थ सर्व खासदारांनी राजीनामे दिले पाहिजे. सामूहीक राजीनाम्याचे सत्रव सुरू झाले पाहीजे. यावर अंतिम निर्णय झालेला नाही. पण वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी यावर सूचना केलेले आहेत. कशा पद्धतीने ही लढाई रस्त्यावर नेता येईल. याबद्दल ही काही नेत्यांनी रणनिती सांगितली आहे. यामुळे काँग्रेसपक्ष आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, या संपूर्ण कारवाईवर राहुल गांधी बोलतील. दुपारी १ वाजता ते माध्यमांसमोर येणार आहेत. १ वाजता काँग्रेसच्या मुख्यालयात ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांनी एक ट्वीट केलं होतं. ते म्हणाले होते की, भारताच्या आवाजासाठी मी लढतोय. त्यामुळे आज पत्रकार परिषेदेत ते नेमके काय बोलतात, हे पाहावं लागेल.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : न्यायालयाचा निर्णय कायद्याप्रमाणे; पण लोकसभाध्यक्षांनी नैतिकता पाळली नाही, सरोदेंनी स्पष्ट सांगितलं

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर निवडणूक आयोग काय पावलं उचलणार हा ही एक मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांचंही अशाच पद्धतीने संसद सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. यानंतर तातडीने आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली होती. त्यामुळे आता राहुल गांधींच्या वायनाड या मतदारसंघात किती वेगाने जाहीर होणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com