
Rajastan : देशातील छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय नेत्यांच्या मोठमोठ्या प्रचारसभा होत आहेत. अशाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीच्या बंदोबस्तासाठी ड्युटीवर जात असताना राजस्थानमधील 6 पोलिसांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील बागसारा येथे पोलिस कर्मचाऱ्यांची गाडी आणि एका ट्रकचा अपघात झाला. यात सहा पोलिसांचा मृत्यू झाला, हे पोलिस कर्मचारी नागौर येथून मोदी यांच्या रॅलीच्या बंदोबस्तासाठी ड्युटीवर जात होते. या पोलिसांना पंतप्रधान मोदी यांच्या रॅलीसाठी तैनात करण्यात आले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पण ड्युटीवर जात असतानाच रविवारी पहाटेच्या सुमारास पोलिस कर्मचाऱ्यांची गाडी आणि ट्रकचा अपघात झाला, यामध्ये या सहा पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये अतिरिक्त एसपी, डीएसपी व अजून काही अधिकाऱ्यांचा समावेश होता. या घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवर (एक्स) या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळल्यानंतर तत्काळ वरिष्ठ पोलिस अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले होते. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. या अपघाताच्या घटनेनंतर काहीवेळ वाहतूक खोळंबली होती. तर या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Edited by Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.