मोठी बातमी : पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर सोडली NDTV ची साथ

Ravish Kumar News : पत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा
Ravish Kumar News
Ravish Kumar Newssarkarnama
Published on
Updated on

Ravish kumar : 'न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड' एनडीटीव्ही या वृत्त प्रसारण वाहिनीचे संस्थापक प्रणॉय रॉय आणि राधिका रॉय यांनी प्रवर्तक कंपनी 'आरआरपीआर होल्डिंग्ज' म्हणजेच आरआरपी आरएचच्या प्रवर्तक (प्रमोटर) पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक, पत्रकार रवीश कुमार (Ravish Kumar) यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला.

जनसामान्यांचे प्रश्न सातत्याने एनडीटीव्हीच्या 'प्राइम टाइम' या कार्यक्रमाद्वारे रवीश कुमार यांनी मांडले आहे. त्यानिमित्त रवीश कुमार यांना सर्वोच्च रॅमन मॅगसेसे पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.

Ravish Kumar News
Uddhav Thackeray: '' कुठं शिवाजी महाराज, कुठं आग्रा आणि...''; ठाकरेंचा लोढांवर हल्लाबोल

रवीश कुमार यांनी अथक प्रयत्नानंतर हे यशाचे शिखर पटकावले होते. १९९६ पासून ते एनडीव्हीमध्ये होते. समाजाच्या समस्या, देशातील परिस्थिती, सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची कला. 'रवीश की रिपोर्ट,' 'प्राइम टाइम' या कार्यक्रमाद्वारे जनसामान्यांना भेडसावणारे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले.

Ravish Kumar News
प्रतापगडावर केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर मंत्री लोढांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

केंद्र सरकारला थेट प्रश्न विचारण्याचे धाडस रवीश यांनी एनडीटीव्हीच्या माध्यमातून दाखवले. नियमीतपणे त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवला होता. विद्यार्थ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, या मुद्यावर त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले होते. पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना प्रतिष्ठित रामनाथ गोयंका एक्सलेन्स इन जर्नालिझम अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com