Robert Kiyosaki warning : क्रॅश अटळ, काळजी घ्या! रॉबर्ट कियोसाकी यांनी वाढविले टेन्शन, सोने-चांदीच्या भावाचा अंदाज पाहून च्रकावून जाल...

Gold price prediction : कियोसाकी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, क्रॅश अटळ आहे. प्रसिध्द मार्केट विश्लेषक जिम रेकॉर्डस् यांचा हवाला देत त्यांनी सोन्याचे भाव एक लाख डॉलर प्रति औंसवर जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
Gold Rate
Gold RateSarkarnama
Published on
Updated on

Gold investment India : इराण युध्दामुळे जगाला आर्थिक मंदीची चिंता सतावत असतानाच 'रिच डॅड पुअर डॅड' या प्रसिध्द पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाठी यांनी केलेल्या धक्कादायक दाव्याने खळबळ उडाली आहे. आर्थिक मंदीचे मोठे संकट येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच या संकटकाळात श्रीमंतीचा मार्गही त्यांनी सांगितला आहे.

रॉबर्ट कियोसाकी यांनीही यापूर्वी लोकांना अलर्ट केले आहे. आता त्यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियात पोस्ट करत धक्कादायक दावा केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी एकप्रकारे लोकांना सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. सोन्या-चांदीच्या भावाचा अंदाज सांगत त्यांनी तुम्हीही श्रीमंत होऊ शकता, असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

कियोसाकी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, क्रॅश अटळ आहे. प्रसिध्द मार्केट विश्लेषक जिम रेकॉर्डस् यांचा हवाला देत त्यांनी सोन्याचे भाव एक लाख डॉलर प्रति औंसवर जाईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या सोन्याचे दर ४ हजार ५०० डॉलर एवढ आहेत. चांदीचे भावही २०० डॉलर प्रति औंसवर पोहचतील. हे भाव सध्या ७५ डॉलर एवढे आहेत.

Gold Rate
Rahul Gandhi prediction : मोदी सरकार वर्षभरातच कोसळणार! राहुल गांधी यांची भविष्यवाणी, कारणही सांगितले...

तुम्हाला काय वाटतं?, असा सवाल करत कियोसाकी यांनी पुढे म्हटले आहे की, 'सर्वोत्तम गुंतवणूकदार भविष्य पाहू शकतात आणि त्यानुसार निर्णय घेतात. लक्षात ठेवा, या संकटात बळी ठरण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्ही श्रीमंत होऊ शकता. काळजी घ्या.' सध्याच्या जागतिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर कियोसाकी यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

Gold Rate
Cockroach Janata Party news : अभिजीत दीपके यांनी PM मोदींच्या विश्वासू मंत्र्यांना घेतलं शिंगावर, पुराव्यानिशी दिलं प्रत्युत्तर; क्रॉक्रोच जनता पार्टीला भारतातूनच 'सपोर्ट'

किती होतील सोन्याचे भाव?

कियोसाकी यांनी सोन्याचे प्रति औंसमध्ये दिले आहे. भारतीय बाजारानुसार, एक औंस म्हणजे सुमारे २८.३५ ग्रॅम एवढे असते. सध्याचा सोन्याचा भाव प्रति तोळा म्हणजे १० ग्रॅमसाठी सुमारे १ लाख ५२ हजार एवढा आहे. कियोसाकी यांच्या अंदाजानुसार, हा भाव प्रति १० ग्रॅम तब्बल ३३.८० लाखांवर पोहचू शकतो. तर चांदीचा भाव ६.७६ लाखांवर जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com