Saayoni Ghosh news : सायोनी घोष यांना पहिला झटका; कार्यकर्त्यांनी मतदारसंघातील कार्यालयाला ठोकले टाळे

Jadavpur Lok Sabha, Saayoni Ghosh office : तृणमूलमधून बंड केल्यानंतर जादवपूरमध्ये घोष यांच्याविरोधात संताप उफाळला; कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकत ‘गद्दारांसाठी जागा नाही’ अशी भूमिका घेतली.
Saayoni Ghosh news
Saayoni Ghosh news Sarkarnama
Published on
Updated on

TMC rebel MP : तृणमूल काँग्रेसमधील २० खासदारांनी नॅशनलिस्ट सिटीझन पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला होता. या २० खासदारांपैकी सर्वाधिक चर्चा झाली ती खासदार सायोनी घोष यांच्या बंडखोरीची. त्या तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या अत्यंत विश्वासू मानल्या जात होत्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांची भाजपविरोधी भाषणे चांगलीच गाजली होती. त्यामुळे त्यांच्या बंडाने ममतांसह अनेकांना मोठा धक्का बसला आहे.

सायोनी घोष या जादवपूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. २०२४ च्या निवडणुकीत त्या पहिल्यांदाच विजयी झाल्या. पण पक्षाच्या विधानसभेतील पराभवानंतर त्यांनी बंड केले. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या जादवपूरमधील कार्यकर्त्यांचा रोषाला त्यांना सामोरे जावे लागत आहे. काही कार्यकर्त्यांनी सायोनी यांच्या जादवपूरमधील कार्यालयाला टाळे ठोकले आहे.

जादवपूरमदील वॉर्ड १०६ मधील या कार्यालयामध्ये सायोनी यांच्या कार्यालयीन सचिवाला बाहेर काढत कार्यकर्त्यांनी जोरदार हंगामा केला. गद्दारांसाठी इथे जागा नाही, असे बॅनर कार्यालयावर लावण्यात आले आहेत. खासदाराने जर पक्ष बदलला असेल तर मग त्यांना तृणमूलचे कार्यालय आणि सुविधा वापरण्याचा अधिकार नाही, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

Saayoni Ghosh news
Rahul Gandhi viral photo : राहुल गांधींसोबतची 'ती' महिला अन् मुलगा कोण? केंद्रीय मंत्र्यांकडून फोटो शेअर, काँग्रेसकडून खुलासा

खासदार बनल्यानंतर सायोनी यांच्याकडून स्थानिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी याच कार्यालयाचा वापर केला जात होता. याच कार्यालयात पक्षाच्या बैठकांचेही आयोजन केले जात होती. लोकसभा मतदारसंघाचे बहुतेक महत्वाचे निर्णय याच कार्यालयातून होत होते. मात्र, घोष यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याविरोधात कार्यकर्त्यांचा रोष आता उघडपणे समोर येऊ लागला आहे.supreme

Saayoni Ghosh news
Shiv Sena Supreme Court : शिवसेनेची घटना लोकशाहीविरोधी असेल तर मग आमदार, मंत्रीही..! सुप्रीम कोर्टात सिब्बलांनी एकनाथ शिंदेंना पकडलं कात्रीत

अभिनेत्री असलेल्या सायोनी यांनी २०२१ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्या युवक शाखेच्या अध्यक्ष बनल्या. त्यांना लगेचच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळाले आणि मोठ्या मताधिक्याने निवडूनही आल्या. त्याआधीच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांना उमेदवारी मिळाली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तृणमूलचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यामुळे त्या राजकारणात आल्याचे सांगितले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com