

Kerala Congress Politics News : गल्ली ते दिल्ली राजकारणात श्रेय वादाचे अनेक प्रकरणे समोर आली असून यावरून कार्यकर्ते भिडल्याचे देखील समोर आले आहे. तर श्रेय घेण्यावरून राजकारणी मागेही हटताना दिसत नाही. यावरून टीका आणि वाद होतो.
पण केरळमध्ये मात्र उलट चित्र समोर आले असून सध्या काँग्रेसच्या विद्यमान आमदाराचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून त्याने केलेल्या कृतीची चांगलीच चर्चा होत आहे. तर मतभेद बाजूला ठेवून विकासकामांचे श्रेय योग्य व्यक्तीला दिले तर राजकारण कधीच वाईट नाही असेही बोलले जात आहे.
कोट्टायम जिल्ह्यातील पुंजर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस (Congress) नेते आणि विद्यमान आमदार सेबॅस्टियन एम.जे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांच्या कृतीचे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर मोठे कौतुक होत आहे. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात १८ सप्टेंबर रोजी एका पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मात्र एमजे यांनी याचे श्रेय लाटले नाही. उलट त्यांनी या पुलाचे उद्घाटन एकट्याने करण्यास नकार दिला. तर पराभूत माजी आमदार ॲड. सेबास्टियन कुलतुंकल यांना बोलावण्याचा आग्रह धरला होता. धक्कादायक बाब म्हणजे एम.जे यांनीच कुलतुंकल यांना पाडले होते.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार ज्या माजी आमदार (MLA) कुलतुंकल यांनी एरमेली-अमाकुन्नू या पुलासाठी प्रयत्न केला होता. त्याच्या बांधकामासाठी आपल्या आमदार फंडातून निधी दिला होता. या पुलाच्या बांधकामासाठी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. तर १८ सप्टेंबर रोजी त्याचे उद्घाटन झाले.
यादरम्यान लोकार्पणासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. तर काँग्रेस नेते आणि विद्यमान आमदार सेबॅस्टियन एम.जे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले जाणार होते. यावेळी एम.जे यांनी यासाठी स्पष्ट नकार देत संपूर्ण पूल माजी आमदारांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाला आहे. यामुळे त्यांनी एकट्याने त्याचे उद्घाटन करणे चुकीचे ठरले असते, असे स्पष्टीकरण देत माजी आमदारांना आमंत्रित करण्याचे निर्देश दिले. तर कुलतुंकल यांना फक्त आमंत्रित केले नाही तर या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून पुत्रिकेवर नाव टाकले. तसेच दोघांनी मिळून संयुक्तपणे या पुलाचे उद्घाटन केले. आणखी एक विशेषबाब म्हणजे काँग्रेस आमदार एम.जे यांनी पुलाच्या कोनशिलेवर स्वतःचे नाव न टाकता माजी आमदारांचे नाव कोरले.
दरम्यान एमजे यांनी सांगितले की, माजी आमदारांना पुलाच्या उद्घाटनासाठी आमंत्रित करणे म्हणजे त्यांचा अपमान नाही किंवा माझा. आपण निधी दिला नसताना त्याचे श्रेय लाटने चुकीचे आहे. त्यांनी निधी दिला असेल, तर आपण त्यांचा आदर केला पाहिजे. यात राजकारण नाही. राजकारण म्हणजे समाजाचा विकास. तर माजी आमदारांनी देखील त्यांची कर्तव्ये चांगल्या प्रकारे पार पाडली आहेत. आता आपली जबाबदारी आहे की आपण देखील सन्मानाने त्या पार पाडल्या पाहिजेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.