भाजपला मोठा धक्का! आणखी एका मंत्र्याच्या राजीनाम्याने राजकीय भूकंप

दारासिंह चौहान (Dara Singh Chauhan) हे भाजप ओबीसी मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
Dara Singh Chauhan
Dara Singh ChauhanSarkarnama
Published on
Updated on

लखनौ : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपला जोरदार धक्के बसत आहे. ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री स्वामीप्रसाद मौर्य यांनी काल (ता.11) राजीनामा दिल्यानंतर चार तासांतच चार आमदारांनी पक्षाला रामराम केला होता. आता आज आणखी एक बडे मंत्री दारासिंह चौहान (Dara Singh Chauhan) पक्षावर राजीनामा बॉम्ब टाकला आहे. भाजपला खिंडार पडल्याने राज्यात राजकीय भूकंप घडला आहे. चौहान हे भाजप ओबीसी मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

भाजपच्या (BJP) उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह बडे नेते काल (ता. 11) दिल्लीत दाखल झाले. त्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसह पाच आमदारांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मौर्य यांनी भाजपला रामराम केला असून, ते 14 जानेवारीला समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. आता आणखी एक मंत्री दारासिंह चौहान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. वन व पर्यावरण मंत्रालयाची धुरा सांभाळत असलेले चौहान हे ओबीसी समाजातील बडे नेते मानले जातात.

Dara Singh Chauhan
भाजपचं 24 तासांत जशास तसं उत्तर! अखिलेश यादवांचा जवळचा नातेवाईकच फोडला

मौर्य यांच्या राजीनाम्यानंतर काल (ता.11) त्यांचे समर्थक मानले जाणारे आमदार रोशन लाल वर्मा, ब्रिजेश प्रजापती, भगवती सागर आणि विनय शाक्य या आमदारांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. हे चौघेही मौर्य यांच्याप्रमाणेच समाजवादी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. मौर्य हे ओबीसी नेते असल्याने उत्तर प्रदेशात भाजपला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मौर्य यांच्यानंतर इतर नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर असून, भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

Dara Singh Chauhan
काँग्रेसला मोठा धक्का! आमदार रामराम करून थेट भाजपमध्ये दाखल

मागील काही दिवसांपासून मौर्य हे अखिलेश यादव यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले जाते. मागील निवडणुकीत भाजपला जातीच्या राजकारणाने सत्तेत पोहचवल्याचे मानले जाते. दलित, मागासवर्गाच्या मतदानाचा टक्का अधिक असल्याने अखिलेश यादव यांनीही आता या जातींकडे लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे भाजपमधील या नेत्यांनाही आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच मौर्य यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com