Shakib Al Hasan : 'आधी दगडफेक, मग थेट पेट्रोल बॉम्बने आग...', दिग्गज खेळाडूच्या घरावर भयंकर हल्ला! थरारक व्हिडिओ समोर!

Shakib Al Hasan petrol bomb attack : दिग्गज खेळाडूच्या घरावर दगडफेक झाल्यानंतर पेट्रोल बॉम्बने आग लावण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा. नेमकं काय घडलं आणि व्हायरल व्हिडिओत काय दिसतं, जाणून घ्या.
Shakib Al Hasan : 'आधी दगडफेक, मग थेट पेट्रोल बॉम्बने आग...', दिग्गज खेळाडूच्या घरावर भयंकर हल्ला! थरारक व्हिडिओ समोर!
Sarkarnama
Published on
Updated on

बांगलादेशचा माजी क्रिकेट कर्णधार शाकिब अल हसन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी कारण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीशी संबंधित नसून, बांगलादेशातील मगुरा येथील त्याच्या घरावर झालेला हल्ला आहे. काही अज्ञात व्यक्तींनी घरावर दगडफेक करत तोडफोड केली आणि त्यानंतर आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर बांगलादेशातील राजकीय वातावरणही अधिक तापल्याची चर्चा सुरू झाली आहे.

बुधवारी रात्री मगुरा शहरातील केशब मोड परिसरात काही लोक अचानक शाकिब अल हसनच्या घरासमोर जमा झाले. जमावाने घरावर दगडफेक करत खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर घराला आग लावण्याचाही प्रयत्न झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. मात्र हल्लेखोर कोण होते आणि त्यांचा उद्देश काय होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Shakib Al Hasan : 'आधी दगडफेक, मग थेट पेट्रोल बॉम्बने आग...', दिग्गज खेळाडूच्या घरावर भयंकर हल्ला! थरारक व्हिडिओ समोर!
Uma Shankar Singh : बहुजन समाज पक्षाचे उत्तर प्रदेशातील एकमेव आमदार उमाशंकर सिंह यांचे निधन

या घटनेला आणखी महत्त्व प्राप्त झालं कारण हल्ला झालेल्या दिवशीच शाकिब अल हसन नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका मीडिया कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी संबोधन केले होते. कार्यक्रम संपल्यानंतर काही तासांतच शाकिबच्या घरावर हल्ला झाल्याचा दावा करण्यात आल्याने या दोन घटनांचा संबंध जोडला जात आहे.

शाकिब अल हसन यापूर्वी मगुरा-1 मतदारसंघातून अवामी लीगच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आला होता. त्यामुळे या प्रकरणाकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा म्हणून नव्हे, तर राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. तरीही हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या प्रकरणानंतर अवामी लीगने अधिकृत निवेदन जारी करत शाकिबच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला झाल्याचा आरोप केला आहे. पक्षाने म्हटले आहे, "शेख हसीना यांच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे शाकिबला लक्ष्य करण्यात आलं." तसेच, "या कार्यक्रमापूर्वी काही राजकीय पक्षांनी माध्यम संस्थांना इशाराही दिला होता," असा आरोपही अवामी लीगने केला आहे. पक्षाने हा हल्ला विरोधकांनी नियोजनपूर्वक घडवून आणल्याचाही दावा केला आहे.

मात्र, सध्या उपलब्ध माहितीनुसार घरावर दगडफेक करून तोडफोड करण्यात आली आणि आग लावण्याचा प्रयत्न झाला, एवढीच बाब समोर आली आहे. पेट्रोल बॉम्बचा वापर झाल्याचा दावा केवळ अवामी लीगकडून करण्यात आला असून, त्याला अद्याप स्वतंत्र किंवा अधिकृत पातळीवर दुजोरा मिळालेला नाही.

Shakib Al Hasan : 'आधी दगडफेक, मग थेट पेट्रोल बॉम्बने आग...', दिग्गज खेळाडूच्या घरावर भयंकर हल्ला! थरारक व्हिडिओ समोर!
Hinjewadi IT Park : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मोठा बंदोबस्त अचानक 100 NSG कमांडोंची एन्ट्री अन्... नक्की काय घडलं? पाहा UNSEEN Video

या संपूर्ण घटनेत अनेक दावे, आरोप आणि राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. हल्ल्यामागील खरे कारण, संबंधित व्यक्तींची ओळख आणि पेट्रोल बॉम्बचा वापर झाला होता का, याचा उलगडा अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com