Hinjewadi IT Park : हिंजवडी आयटी पार्कमध्ये मोठा बंदोबस्त अचानक 100 NSG कमांडोंची एन्ट्री अन्... नक्की काय घडलं? पाहा UNSEEN Video

100 NSG commandos enter Infosys Pune: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 NSG कमांडोंची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली. हा दहशतवादी धोका होता की सुरक्षा मॉक ड्रिल? जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि पाहा UNSEEN Video.
NSG commandos in Hinjewadi IT Park
NSG commandos in Hinjewadi IT ParkSarkarnama
Published on
Updated on

NSG mock drill in Pune IT park: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमध्ये बुधवारी अचानक मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आणि 100 हून अधिक NSG कमांडोंचा ताफा दाखल झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

शस्त्रसज्ज कमांडोंचे ताफे, सुरक्षा वाहनांची वर्दळ आणि कडेकोट बंदोबस्त पाहून अनेक कर्मचारी व नागरिकांमध्ये नेमके काय घडले, असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, काही वेळातच ही कोणतीही आपत्कालीन घटना नसून सुरक्षा यंत्रणांकडून आयोजित करण्यात आलेली विशेष मॉक ड्रिल असल्याचे स्पष्ट झाले.

जागतिक स्तरावरील कंपन्यांचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये सुरक्षेची तयारी किती सक्षम आहे, याची पडताळणी करण्यासाठी हा विशेष सराव आयोजित करण्यात आला होता. दुपारी 4 वाजता सुरू झालेली ही हाय-व्होल्टेज मोहीम रात्री 9 वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल 5 तास सुरू होती. या कालावधीत विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये सुरक्षा यंत्रणांचा प्रतिसाद, समन्वय आणि कार्यक्षमता तपासण्यात आली.

NSG commandos in Hinjewadi IT Park
Ichalkaranji BJP : 22 कोटींच्या कामावरून भाजपमध्ये वाद! CM फडणवीसांसोबतची बैठक रद्द झाल्याने नवा प्लॅन, आता 'या' मंत्र्यावर मोठी जबाबदारी

माण-हिंजवडी परिसरातील एका नामांकित आयटी कंपनीच्या परिसरात हा सराव पार पडला. संभाव्य दहशतवादी हल्ला किंवा इतर गंभीर सुरक्षा संकट उद्भवल्यास विविध यंत्रणांनी किती वेगाने आणि प्रभावीपणे प्रतिसाद द्यावा, यासाठी प्रत्यक्ष परिस्थिती निर्माण करून सराव करण्यात आला. या मोहिमेचा उद्देश सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय अधिक मजबूत करणे आणि क्विक रिस्पॉन्स सिस्टीमची चाचणी घेणे हा होता.

या विशेष ऑपरेशनमध्ये भारतीय NSG कमांडोंसोबत अमेरिकेचे 17 विशेष कमांडोही सहभागी झाले होते. अत्याधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक सुरक्षा उपकरणे आणि प्रगत शस्त्रास्त्रांच्या मदतीने विविध परिस्थितींवर नियंत्रण मिळवण्याची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. स्थानिक पोलीस, सुरक्षा कर्मचारी आणि संबंधित यंत्रणांनीही या मॉक ड्रिलमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.

NSG commandos in Hinjewadi IT Park
Ravindra Dhangekar Warns BJP : ऑडिओ क्लिपमुळे रवींद्र धंगेकर संतापले, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना अल्टीमेटम! म्हणाले, ' रोज पोलखोल करू'

हिंजवडी आयटी पार्कमध्ये (Hinjewadi IT Park) दररोज हजारो कर्मचारी कामासाठी येत असल्याने या परिसराची सुरक्षा अधिक सक्षम ठेवणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे अशा प्रकारच्या सरावांमधून संभाव्य धोक्यांना तोंड देण्याची तयारी तपासली जाते.

सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दलांची उपस्थिती पाहून अनेकांमध्ये भीती आणि उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, हा केवळ नियोजित सुरक्षा सराव असल्याचे समोर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या उपक्रमामुळे हिंजवडी आयटी पार्कच्या सुरक्षेविषयी नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये अधिक विश्वास निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com