

Eknath Shinde Politics News : राज्यात नुकताच ठाकरेंचे सहा खासदार फोडण्यात आले असून आता शिवसेनेचे 14 आमदार रडारवर आहेत. शिवसेनेचे हे ऑपरेशन टायगर 3.0 लवकरच पूर्णत्वास जाईल अशी अशी चर्चा रंगली आहे. अशातच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर एकनाथ शिंदे यांची रणनीती समोर येत आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुका 2027 ला होणार असून शिंदेंनी आपले लक्ष गोव्याकडे वळवले असून येथे शिवसेनेला उमेदवार उतरवणार आहे. राज्याबाहेर जाऊन निवडणूका लढवून पहिले राजकीय यश मिळवण्यासाठी शिंदेंची शिवसेनेनं कंबर कसली असून गोव्यातील 40 पैकी 30 जागा लढवणार असल्याचीही माहिती मिळत आहे.
इंडिया टुडेत आलेल्या वृत्तानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोव्यात होणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. गोवा विधानसभेच्या निवडणुका 2027 ला होणार असून कदाचित त्या आधीच म्हणजे 2026 च्या मध्यावधीत होतील अशी चर्चा आहे. तर राज्याबाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी शिंदेंकडून हा निर्णय घेतला जाऊ शकतो असेही यात म्हटले आहे.
असे झाल्यास राज्यात महायुती म्हणून एकत्र असणाऱ्या भाजपविरोधातच शिवसेनेला आपले उमेदवार उतरावे लागतील. सध्या येथे भाजपचीच सत्ता असून खरंच शिंदे असा निर्णय घेतील का याकडे आता राज्यासह गोव्याचे लक्ष लागले आहे.
इंडिया टुडेत आलेल्या वृत्तानुसार, 'गोवा विधानसभा मिशन'साठी शिंदेंच्या शिवसेनेनं रणनीती आखली असून माजी लोकसभा खासदार गजानन कीर्तीकर आणि मुंबईचे माजी नगरसेवक दिलीप नाईक व राजू पेडणेकर यांच्याकडे जबाबदारी दिल्याचेही वृत्त आहे. पेडणेकर यांच्याकडे उत्तर गोवा तर नाईक यांच्याकडे दक्षिण गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान आता शिवसेना राज्याबाहेर अशा पद्धतीने पहिल्यांदाच निवडणूक लढवत नाही. याआधी 1991 मध्ये राम मंदिर आंदोलन शिखरावर असताना उत्तर प्रदेशातील अकबरपूर मतदारसंघातून पवन कुमार पांडे शिवसेनेचा उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांचा विजय झाला होता.
यानंतर 2022 मध्ये पक्ष फुटीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करत गोव्यात 23 उमेदवार उभे केले होते. ज्यात शिवसेनेनं 10 आणि राष्ट्रवादीने 13 जागा लढवल्या होत्या. या वेळी शिवसेनेला एकूण मतांपैकी अवघी 0.18 टक्के मते मिळाली होती.
दरम्यान आता मुंबईचे माजी नगरसेवक दिलीप नाईक यांची प्रतिक्रिया याबाबत समोर आली असून गोव्यात निवडणुकीच्या कामाला पक्षाने सुरुवात केली असून लवकरच उमेदवार निश्चित केले जाणार असल्याचे नाईक यांनी सांगितले आहे.
तसेच माजी लोकसभा खासदार गजानन कीर्तीकर यांनी देखील यावर भाष्य करताना गोव्यातील लोकांच्या गरजा, भूमिपुत्रांना न्याय, स्थानिकांना मिळणारी अपमानास्पद वागणूक आणि उत्तर भारतातील लोकांचे होणारे आक्रमण रोखण्यासाठी शिवसेना येथे उतरणार आहे. तर येथे लवकरच बूथ पातळीवरील प्रचार यंत्रणा सज्ज केली जाईल. ज्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांत उमेदवार निश्चित केले जातील, असं सूचक वक्तव्य कीर्तीकर यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.