Smriti Irani: राहुल गांधींच्या दणक्यानंतर भाजपच्या दिग्गज नेत्यावर आली होती दुसरं काम शोधण्याची वेळ; स्वतःच केला गौप्यस्फोट

Smriti Irani comeback in TV serial : स्मृती इराणी या मुळात एक अभिनेत्री आहेत. यापूर्वी त्या 'क्यों की सास भी कभी बहु थी' या मालिकेमुळं घराघरात पोहोचल्या होत्या.
Rahul Gandhi
Rahul Gandhi sarkarnama
Published on
Updated on

Smriti Irani comeback in TV serial : माजी केंद्रीय शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांचा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून राहुल गांधींचे सहकारी किशोरीलाल शर्मा यांनी मोठ्या फरकानं पराभव केल्यानंतर इराणी यांच्यावर काम शोधण्याची वेळ आली होती. त्यामुळं इराणी यांना टीव्ही चॅनेवरील 'क्योंकी सास भी कभी बहु थी-२' या कार्यक्रमात प्रमुख भूमिका स्विकारली. अशा प्रकारे राहुल गांधींच्या दणक्यानंतर त्यांच्यावर दुसरं काम शोधण्याची वेळ आल्याचं स्वतः स्मृती इराणी यांनी सांगितलं आहे.

स्मृती इराणी या मुळात एक अभिनेत्री आहेत. यापूर्वी त्या 'क्यों की सास भी कभी बहु थी' या मालिकेमुळं घराघरात पोहोचल्या होत्या. या मालिकेतील तुलसी नामक कथित संस्कारी बहुची भूमिका त्यांनी साकारली होती. मालिका प्रचंड लोकप्रिय झाल्यानं सहाजिकच स्मृता इराणी यांचा मालिका विश्वात आणि जनमानसात चांगली ओळख निर्माण झाली होती. त्यामुळं आपल्या या फेमचा फायदा करुन घेण्यासाठी आणि राजकारणात येण्याची इच्छा असल्यानं त्यांनी भाजपकडून खासदारकीसाठी उमेदवारी मिळवली, २०१४ मध्ये निवडून आल्या आणि खासदार बनल्या. त्यामुळं गेल्या २० वर्षांनंतर २०२५ मध्ये त्या पुन्हा कॅमेरॅसमोर परतल्या. नुकत्याच एका माध्यमाच्या प्रतिनिधीशी मुलाखती दरम्यान त्यांनी हा खुलासा केला आहे.

Rahul Gandhi
Manoj Jarange Patil : 'जरांगे पाटलांच्या एका वाक्यावर...'; ठाकरेंच्या बड्या नेत्याचा थेट सरकारला गंभीर इशारा,सरकारचे टेन्शन वाढणार!

नोकरी मागण्यासाठी बाहेर पडल्या

सर्वात आधी इराणी यांनी हा खुलासा केला की, त्यांना नोकरी शोधण्यासाठी संबंधित लोकांना स्वतःहून फोन करावा लागला. मी माझा फोन उचलला आणि मीडियात तसंच मनोरंजन क्षेत्रात नोकरीची मागणी केली. मी त्यांना म्हटलं की, मी बेरोजगार आहे तुम्हा मला नोकरी द्याल का?

दरम्यान, स्मृती इराणी यांनी यावेळी सांगितलं की, जेव्हा 'क्यों की...' हा शो संपला तेव्हा जिओ हॉटस्टार आणि स्टारचे उपाध्यक्ष उदय शंकर यांनी धुरा सांभाळली होती. त्यांच्यामुळंच मला मनोरंजन क्षेत्रातून आपली नोकरी गमवावी लागली होती. त्यानंतर पुन्हा त्यांच्याच मदतीनं मी या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.

मी त्यांना म्हटलं की, सर माझ्याजवळ सध्या नोकरी नाही. तुम्ही माझी मदत करु शकाल का? त्यावेळी उदय शंकर हे परदेशात होते. तसंच त्यांनी जेव्हा माझं म्हणणं ऐकून घेतलं तेव्हा त्यांनी विचारलं की, तुम्ही खरोखरच पुन्हा इंडस्ट्रीत काम करणार आहात का? कारण तुम्ही कॅबिनेट मंत्री होता आणि आता नोकरी मागत आहात. त्यावर मी म्हटलं की, मला नाही वाटतं की आपल्या व्यवसायात पुनरागमन करण्यात काही वाईट आहे.

Rahul Gandhi
Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा प्राध्यापकांना मोठा दिलासा! पगारात फेरफार करणाऱ्या विद्यापीठांना झापलं, दाखवला UGCचा नियम

राजकारणात कोणीही मित्र नसतं

दरम्यान, हा निर्णय त्यांच्यासाठी स्वातंत्र्य बहालं करणारा होता. कारण कोणालाही त्यांच्याकडून हे अपेक्षित नव्हतं. परिस्थिती बदलल्यानंतर ती स्विकारुन पुन्हा नव्यानं सुरुवात करण्यासाठी तयार राहण्यात एक स्वातंत्र्य आहे. राजकारणात कोणीही मित्र नसतो. काम करत असताना ते केवळ तुमचे सहकारी असू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com