Sonia Gandhi on Anna Hazare movement : अण्णा हजारेंबाबत सोनिया गांधींचा मोठा दावा; विरोधकांचे खरे उद्दिष्ट साध्य होताच त्यांच्याबद्दल पुन्हा काहीही लिहिले गेले नाही..!

Sonia Gandhi, Anna Hazare, Belonging A Journey of Love, Anna Hazare movement : आंदोलन सुरू असताना पडद्यामागे आरएसएस एका नवीन पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी पायाभरणी करत होता, असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे.
Anna Hazare, Sonia Gandhi
Anna Hazare, Sonia Gandhi Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Sonia Gandhi autobiography news : काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी आपल्या आत्मचरित्रात अनेक महत्वाच्या घडामोडींवर प्रकाशझोत टाकला आहे. 'यूपीए-२' सरकारच्या काळात दिल्लीत मोठे आंदोलन झाले होते. या आंदोलनामुळेच देशात २०१४ मध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही, असा दावा केला जातो. त्यावर सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात भाष्य केले.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाविषयी एकच परिच्छेद आहे. मात्र, त्यांनी हजारे यांचे आंदोलन हे सरकार उलथवून टाकण्यासाठीच होते, असे सूचक विधान केले आहे. या पुस्तकामध्ये आंदोलनाचे वर्ष २०१२ असे दिले आहे. प्रत्यक्षात २०११ मध्ये हे आंदोलन झाले होते. सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील एक प्रसिध्द कार्यकर्ते बाबूराव "अण्णा" हजारे असा केला आहे.

अण्णा हजारे हे 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' नावाच्या चळवळीचे नेतृत्व म्हणून पुढे आले. या चळवळीला गुप्तपणे भाजप आणि आरएसएसचे पाठबळ होते, हे नंतर चळवळीतील काही सहभागींनी म्हटले आहे. लोकपाल नियुक्त करण्याच्या मागणीसाठी हजारे यांना दिल्लीत मोठ्या थाटामाटात उपोषणासाठी आणण्यात आले. आंदोलनाला गर्दी जमली अन् भाजपच्या आक्रमक प्रचारासमोर आम्ही बचावात्मक पवित्र्यात आलो, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

Anna Hazare, Sonia Gandhi
Gokul election update : कोर्टाचा निकाल विरोधात गेला तरी 'गोकुळ'वर महायुतीचीच सत्ता; हसन मुश्रीफांनी लगेच सांगितला पुढचा प्लॅन

सोनिया गांधींनी पुढे म्हटले आहे की, २०१४ मध्ये आम्ही लोकपाल विधेयक आणले. या विधेयकामुळे केंद्रीय स्तरावरील लोकपाल आणि राज्यांमधील लोकायुक्तांना अधिकाऱ्यांवरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची चौकशी करण्याचे अधिकार मिळाले. परंतु भाजपच्या काळात हे विधेयक विस्मृतीत गेले आहे. ते एका दात नसलेल्या वाघासारखे बनून राहिले आहे, अशी खंतही सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे.

Anna Hazare, Sonia Gandhi
Gokul directors news : 'गोकुळ'मधील चार शासन नियुक्त संचालकांचे असे आहे राजकीय कनेक्शन; मंत्री, खासदार, आमदारांचे विश्वासू...

आमच्या विरोधकांनी सरकार उलथवून टाकण्याचे खरे उद्दिष्ट साध्य केल्यानंतर अण्णा हजारे यांच्याबद्दल पुन्हा काहीही ऐकू आले नाही किंवा त्यांच्याबद्दल लिहिले गेले नाही, असेही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. याचकाळात पडद्यामागे आरएसएस एका नवीन पंतप्रधानपदाच्या उमेदवारासाठी पायाभरणी करत होता, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.