Jharkhand Protest: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला दुसर्‍यांदा मोठं यश; केंद्रानंतर झारखंड सरकारही झुकलं, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची महत्त्वपूर्ण घोषणा

Jharkhand Student Protest: झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथील जयपाल सिंह स्टेडियम येथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोमवारी(ता.17) रात्री माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोरेन म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाने JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी ही एक मागणी होती.
Jharkhand Protest  .jpg
Jharkhand Protest .jpgSarkarnama
Published on
Updated on

Jharkhand News: झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोमवारी JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. तसेच TSR Data Processing Private Limited (TDPL) या कंपनीशी संबंधित सर्व कामकाज, त्यात कंपनीने घेतलेल्या परीक्षा, प्रसिद्ध केलेले निकाल आणि निवड झालेल्या उमेदवारांशी संबंधित प्रक्रियाही रद्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांच्या विरोधात विद्यार्थ्यांचे गेल्या 24 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं.

झारखंडची राजधानी असलेल्या रांची येथील जयपाल सिंह स्टेडियम येथे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोमवारी(ता.17) रात्री माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सोरेन म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाने JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्यांपैकी ही एक मागणी होती.

हेमंत सोरेन यांनी “TDPLशी संबंधित सर्व काही रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी यावेळी टीडीपीएल कंपनीने घेतलेल्या परीक्षा, जाहीर केलेले निकाल, निवड झालेले उमेदवार, परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार तसेच TDPLने केलेल्या इतर सर्व कामकाजाचा समावेश आहे.”

मुख्यमंत्र्यांनी 2014 पासून आतापर्यंत घेण्यात आलेल्या सर्व भरती परीक्षांमधील गैरप्रकारांची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेशही दिले. ते म्हणाले, “2014 पासून झालेल्या छोट्या-मोठ्या सर्व त्रुटींची सखोल चौकशी केली जाईल. केंद्र सरकारने MMDR कायद्यात केलेल्या सुधारणांवर चर्चा करण्यासाठी आम्ही लवकरच बैठक घेऊ. गरज भासल्यास या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशनही बोलावले जाऊ शकते.”

Jharkhand Protest  .jpg
Navnath Waghmare: "मराठा समाजाच्या महिलांची कान धरुन माफी मागायला तयार पण..."; नवनाथ वाघमारेंच्या जरांगेंबाबतच्या शर्तीमुळं वाद आणखी चिघळणार

विशेष तपास पथक (SIT) आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या (CID) तपासातून अनेक धक्कादायक तथ्ये समोर आली आहेत, असंही सोरेन यांनी सांगितलं. ते म्हणाले, “तपास सुरू असल्याने प्रत्येक माहिती उघडपणे सांगणे शक्य नाही. मात्र, CGL प्रक्रियेतून नियुक्त झालेल्या काही व्यक्तींना JPSC परीक्षेतील गैरप्रकारांशी संबंधित आरोपांवरून अटक करण्यात आल्याचे आढळून आले आहे. याशिवाय, वेगवेगळ्या काळात झारखंडमध्ये कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांचे एकमेकांशी जोडलेले गुंतागुंतीचे नेटवर्क असल्याचेही दिसून आल्याचंही सोरेन यांनी म्हटलं.

सोरेन यांनी यावेळी 2014 पासून आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांचा सखोल तपास करण्याचे निर्देश सरकारने संबंधित विभाग आणि CIDला दिल्याचेही सोरेन यांनी सांगितले. या निर्णयाचं विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी निर्णयाचे स्वागत केले. त्यांनी सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसेच सोरेन, राज्य प्रशासन, पोलीस, माध्यमे, विद्यार्थी आणि पालकांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभारही मानले.

Jharkhand Protest  .jpg
Amit Malviya: CJPच्या धक्क्यानंतर बॅकफुटवर गेलेल्या भाजपत मोठा फेरबदल; अमित मालवीयांच्या 11 वर्षांच्या कारकिर्दीला ब्रेक! दीपक म्हस्केंकडे धुरा

झारखंडच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तसंच इतर स्पर्धापरीक्षांमधील घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राजधानी रांची इथं सध्या विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनानं उच्चांक गाठला होता. पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीचार्ज करावा लागला, बॅरिकेट्ही लावावे लागले होते. काही ठिकाणी पाण्याचे फवारे देखील मारले गेले. यापार्श्वभूमीवर झारखंडच्या सोरेन सरकारवर दिवसागणिक दबाव वाढत चालला होता. त्याचाच एक भाग म्हणून सरकारनं एक मोठी कारवाई करत एका बड्या अधिकाऱ्याला अटकही केली होती.

या परीक्षांच्या घोटाळ्यांची चौकशी सध्या सीआयडी करत असून सीआयडीनं जेपीएससीचे (झारखंड पब्लिक सर्व्हिस कमिशन) माजी अध्यक्ष एल. ख्यांग्ते यांना अटक केली होती. याप्रकरणी सीआयडीकडून अद्यापपर्यंत झालेली ही 20 वी अटकेची कारवाई होती. यापूर्वी सीआयडीच्या उपपरीक्षा नियंत्रकासह 19 जणांना अटक करण्यात आली.

जेपीएससीच्या अध्यक्षांची अनेकदा झाली चौकशी जेपीएससीचे अध्यक्ष एल. खियांग्ते यांनी 22 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एल. खियांग्ते यांनी 28 जुलैपासून अनेकदा चौकशी करण्यात आली होती. तसंच जेपीएससीच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी अजिता भट्टाचार्य, अनिमा हांसदा आणि जमाल अहमद यांचे राजीनामे स्विकारले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com